यवतमाळ सामाजिक

वाय.पी.एल क्रिकेट क्लब यवतमाळ मध्ये सनरायझर्सचा डंका.डॉ. शरीक शेख चे उत्कृष्ट मार्गदर्शन

वाय.पी.एल क्रिकेट क्लब यवतमाळ मध्ये सनरायझर्सचा डंका.डॉ. शरीक शेख चे उत्कृष्ट मार्गदर्शन

यवतमाळ(वसीम शेख). वाय.पी.एल क्रिकेट क्लब यवतमाळ द्वारे यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड वर दिनांक 9 ते 14 मे पर्यंत रात्री कालीनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये खेळाडूंची निवड ऑकशन पद्धतीने केले गेली. स्पर्धेमध्ये डॉ. शारीक शेख द्वारा सनरायझर्स हा संघ घेण्यात आला. या संघाने स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय पारितोषिक पटकाविले. सुरूवातीला या संघाला स्पर्धेमध्ये कमजोर संग असे आकारण्यात आले. पण या संघाच्या खेळाडूंनी उत्तम अशी खेळी करत हा मान मिळवले. प्रसंगी हा संघ यवतमाळकरांच्या गळ्याचा ताईत बनलेला आहे. सनरायझर्स संधाने आपल्या उत्तम, आचरण व्यवहार आणि खेळ भावनेमुळे, दर्शकांचे तसे आयोजकांचे मन जिंकले.या संघामध्ये कर्णधार डॉ. शारिक शेख, उपकर्णधार अब्दुल रहमान, मोहंमद शाहरुख, शोएब खान, तुषार हीमाने, सोनू सोलंकी, अंशुल खडसे, अखिलेश कोल्हे, गाझी खतीब, अझहर शाह, रिजवी, अजमुद्दिन शेख, डॉ.जय राठोड हे खिलाडू होते.

Copyright ©