यवतमाळ सामाजिक

जागतिक जैवविविधता दिन साजरा

जागतिक जैवविविधता दिन साजरा

जागतिक जैवविविधता दिनाचे औचित्य साधून मनपुर* येथे वनवर्तुळाचे संपूर्ण वनविभाग कर्मचारी , वनव्यवस्थापन समिती मनपुर येथील अध्यक्ष व सदस्य तसेच सरपंच व नागरिक आणि एम एच २९ हेलपिंग हँड टीम चे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने मनपुर फाटा ते मनपुर गाव च्या रोड लगत दुतर्फा जंगल व्याप्त भागामध्ये प्लास्टिक निर्मुलन व स्वच्छता अभियान यशस्वी पणे राबविन्यात आले या वेळी ह्यावेळी निलेश मेश्राम सह वनविभागाचे वनपाल सुनील लोहकरे, मनपूर वनरक्षक प्रांजली दांडगे , अर्जुन वनरक्षक विवेक पांडे,वनरक्षक दामोदर नेवारे, व वनमजुर आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती मनपूर अध्यक्ष विष्णू तडसें व सरपंच अविनाश रोकडे , हिवरी मनदेव परिसरातील टीम सदस्य इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.
*प्लस्टिक हे पर्यावरण प्रदूषणाचे प्रेमुख कारण आहे. प्लस्टिक हे शेकडो वर्षे नष्ट न होता जसे च्या तसेच राहतात त्यामुळे ते प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. आपण सुशिक्षित समाजाने प्लास्टिक पिशव्यांचे वापर थांबविणे ही आपली जबाबदारी मानली पाहिजे. कारण वन्यप्राणी नकळत अन्नासह प्लास्टिक ग्रहण करतात. त्यामुळे प्लास्टिक अकाली प्राण्यांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.*
प्लास्टिक पिशव्याला पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापराव्या आणि प्लास्टिक पीशव्याच्या हानिकारक परिनामाबाबत जनजागृती करावी.
प्लास्टिक निर्मूलनासाठी सर्व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळावे.प्लास्टिक निर्मूलनासाठी समाजात सर्व स्तरातून व्यापक जनजागृती करण्यात यावी ।
हे प्लास्टिकचे प्रदूषण रोखले नाही गेले तर मानवी जीवनातस खूप मोठा धोका आहे. आज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी ही काळाची गरज बनली आहे.प्लास्टिकच्या अतिवापरामुळे या सजीवसृष्टीला रास होऊ लागला आहे.असे आव्हानात्मक संदेश देऊन होणाऱ्या परिणाम बाबत जान करून दिली

Copyright ©