बेला प्रतिनिधी कैलास साठवणे
पन्नास वर्ष महिलेवर सामूहिक अत्याचार बेला स्टेशन अंतर्गत जसापुर येथील घटना
बेला पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रियमहामार्ग ७ वर असलेल्या जसापुर (ता नागपूर) बुधवारी सकाळी अंदाजे नऊ ,दहाच्या सुमारास शेळ्या चारायला गेलेल्या पन्नास वर्षे महिलेवर सामूहिक अत्याचार करण्याची घटना घडली महिला विखनी – जसापूर येथील असून नित्यनेमाने सकाळी नऊ वाजता शेळ्या चारायला विखनी वरून जसापुर कडे गेली असता रमेश वराडे यांच्या शेताजवळ शेळ्या चारत असताना तिच्या लक्ष ठेऊन असलेले नराधम सुभाष उर्फ मंथणी मारुती जुगनाके वय 26 वर्षे व गौरव गजानन आडे 21वर्ष हे आरोपी शेतातील झाडाझुडपात लपून बसले होते तिला पाहताच तिच्याकडे धावत गेले व तिला पकडून ओढून झुडपात नेत असतांनी स्वतःला वाचण्याकरिता आरडाओरड करत असल्यामुळे तिच्या तोंडात बोळा कोंबून आरोपी सुभाषने तिचे तोंड एका दाबून हात पाय पकडून दुसऱ्याने जबरीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला व नंतर दुसऱ्याने सुद्धा तिच्यावर वारंवार अत्याचार केला दोघांनी आळीपाळीने सामुहिक अत्याचार केला जेव्हा दोघांचे मन भरले तेव्हा त्या अत्याचार केलेल्या महिलेला कुटुंबीयाकडे व इतर वाचता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तिला त्याच अवस्थेत ठेवून पळ काढला ती कशीबशी घरी पोहोचली झालेली सर्व घटना कुटुंबियांना सांगितली कुटुंबीयांनी बेला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली पोलिस ठाणेदार पंकज वाघोळे यांनी वरिष्ठ अधिकारी श्रीमती पूजा गायकवाड पोलिस उपविभागीय अधिकारी यांना घटनेची माहिती दिली घटनास्थळ व महिलेच्या तक्रारीवरून कलम ३७६ (ड) व ५०६ भा. द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी सुभाष मारुती जुगनाके व गौरव आडे यांना संध्याकाळी अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड करीत आहेत
Add Comment