यवतमाळ सामाजिक

ऑन फील्ड मुख्याधिकारी मडावी यांच्या मार्गदर्शनात मान्सून पुर्व कामांतर्गत दक्षता पेट्रोल पंपानजीकच्या नाल्याची स्वच्छता

ऑन फील्ड मुख्याधिकारी मडावी यांच्या मार्गदर्शनात
मान्सून पुर्व कामांतर्गत दक्षता पेट्रोल पंपानजीकच्या नाल्याची स्वच्छता

यवतमाळ (प्रति) “बोले तैसा चाले” या संतवचनाशी करारबद्ध होऊन काम करणाऱ्या यवतमाळ न.प. च्या प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी यवतमाळ वासीयांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. मान्सुनपुर्व कामांतर्गत शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या ४० सफाई कामगारांच्या टास्क टीमच्या वतिने युध्दपातळीवर नाले सफाईचे काम सुरू आहे.
आज सकाळी शहरातील वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या शणी मंदिर चौकातील दक्षता पेट्रोल पंप शेजारी असलेल्या मोठ्या नाल्याची स्वच्छता करण्यात आली. ही विशेष मोहीम राबवितांना मुख्याधिकारी स्वतः कार्यस्थळावर येतात. कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष नाल्यात उतरुन हाती फावडे घेत त्यांच्या समवेत श्रमदान करतात एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा कर्तव्याप्रतीचा हा समर्पण भाव सफाई कामगारांना अधिकच प्रभावीत करतो. त्यामुळे कामगारांच्या हातांना वेग येतो. आणि बघता बघता नाला स्वच्छ होतो.
हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार या वर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता नाल्याशेजारील लोकांच्या घरात पाणी शिरु नये म्हणून न.प.प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी यांनी नाल्याच्या काठावरील सर्व अतिक्रमणे काढण्यासह ही स्वच्छता मोहीम सुरू केल्यामुळे यवतमाळकर नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या सफाई पथकात आ.नि.प्रफुल जनबंधु, प्र.आ.नि.लता गोंधळे, अशोक मिसाळ, आनंद बिसमोगरे, राहुल चव्हाण, अविनाश मोगरे, अमन चव्हाण, बाबु शहा, संजय गोंधळे, विकास तांबे, सिध्दार्थ खमसे, श्याम देवतळे, राजु कोंढावे, सुरज टाके, कपील कोंढावे, विरेंद्र ब्राह्मणे, राजू मोगरकर इत्यादींचा समावेश होता.
____________________________________

Copyright ©