यवतमाळ सामाजिक

” विश्वात एकमेव परिपूर्ण ज्ञान असलेला महापुरुष म्हणजे शाक्य गौतम बुद्ध- प्रा. डॉ अनंतकुमार सूर्यकार

” विश्वात एकमेव परिपूर्ण ज्ञान असलेला महापुरुष म्हणजे शाक्य गौतम बुद्ध- प्रा. डॉ अनंतकुमार सूर्यकार

बुद्ध म्हणजे परिपूर्ण ज्ञान असलेला पुरूष होय. बुद्ध म्हणजे आचरण आणि विचारांच महापीठ आहे. सत्य, अहिंसा याशिवाय त्री शरण, पंचशील व अष्टांग मार्ग या तत्त्वाला क्रियाशील करणारा महाकारुणिक गौतमच होय. प्रत्येक मानवाला आज बुद्धाच्या विचारांची नितांत गरज आहे . त्याकरिता बुद्ध व त्यांचे विचार समजून घेणे अगत्याचे आहे. असे डॉ अनंतकुमार सूर्यकार, संघटक यवतमाळ तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळ तसेच संत साहित्य व आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक प्रसंगी बोलत होते.
श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने ” गौतम बुद्ध जयंती व वैशाख पौर्णिमा उत्सव ” मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रसंतांच्या विचारप्रवाहातून निर्माण झालेली ” सामुदायिक प्रार्थना “घेण्यात आली. गावातील पुरुष, महिला, तरूण, तरूणी व बाल मंडळी शिस्तबद्ध रीतीने उपस्थित होते.
मंगरूळ गावचे उपसरपंच पंडित पंचभाई यांनी बुद्ध प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही प्रतिमांचे पूजन करून पुष्प माला अर्पण केली.
त्री शरण व पंचशीलचे सामूहिक पठण करण्यात आले. भावेश देवेंद्र मेश्राम या बालकाने मनमोहक बुद्ध विचार मांडले. सुमनताई पिलावन, संगिता राहाटे, सीमाताई देवतळे, उषा पंचभाई, दुर्गा गवळी, लीलाताई नागदेवते, योगिता बनकर, मीराताई राहाटे,कमुताई मानकर, वैशाली मानकर, छायाताई गायकवाड, कलाताई भगत, मनीषा नागदेवते, शालूताई बनकर, सीमाताई बनकर,लताताई महल्ले, शिलाताई वंजारे, चंदाताई मेश्राम, प्रिया मानकर, विठ्ठल कोडापे, मोहन ठाकरे, वासुदेव थोरात, अवधूत गवळी, सुधाकर धोंगडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, गणेश सोनोने, सुधाकर गायकवाड, रवी राहाटे, गणेश बनकर, अरविंद बनकर, गिरीधर भगत, नामदेव मेश्राम, यशवंत गवळी, विजय मानकर, किरण राहाटे, सागर पंचभाई, आकाश गायकवाड,अभय सोनटक्के यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले. गावातील बहुसंख्य स्त्री पुरुष कार्यक्रमास उपस्थित होते.श्रवणीय बुद्ध गीते व भीम गीते प्रसंगी सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन वासुदेव थोरात यांनी केले. शेवटी गुरूदेवांच्या ‘ राष्ट्रवंदनेनी ‘ जयंती समारोहाची सांगता झाली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©