यवतमाळ सामाजिक

ऑटो चालक पित्याचा,मुलगा होणार राजपत्रित अधिकारी संकल्प फाउंडेशन ने केला।सहृदय सत्कार

ऑटो चालक पित्याचा,मुलगा होणार राजपत्रित अधिकारी
संकल्प फाउंडेशन ने केला।सहृदय सत्कार

स्थानिक रूप नगर, अमराई मध्ये वास्तव्यास असलेले श्री दिलीप वाघ ह्यांनी आपल्या ऑटो चे चाक फिरवून व मुलाच्या म्हत्वाकांक्षेने राजपत्रित अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले,ह्याकरिता आज संकल्प फाउंडेशन टीम च्या वतीने वाघ कुटुंबीयांचा घरी पोहचून सहृदय सन्मान पत्र,वृक्ष रोप व पेढे भरवुन सन्मान करण्यात आला,निखिल दिलीप वाघ ह्या तरुणाने परिस्थिती ची जाण ठेवत त्यावर मात करीत, सतत 12 तास अभ्यास करून हे यश संपादन केले,राज्य सेवा आयोगाची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण करणारा निखिल ह्या ब्याच चा जिल्ह्यातून 200 विद्यार्थ्यांनमध्ये एकमेव विद्यार्थी ठरला ह्याचा जेव्हढा आनंद त्याला आहे,तेव्हढीच खंत ही त्याने सन्मान करतांना बोलून दाखवली,की जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रविणता असूनही,पुणे,नागपूर,सारख्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवितात,त्यात कुठलीही अकॅडमी 100 टक्के तयारी करू शकत नाही,आपण जर मनावर घेतले तर यश हे यवतमाळ मध्येही संपादन करू शकतो असे त्याने ठामपणे सांगितले आई वडिलांचे कष्ट व मंत्रालयात नोकरीवर असलेल्या बहीण व भाऊजी ह्यांच्या योग्य साथ व प्रेरणेने मी जिद्द,चिकाटी,आत्मविश्वासाच्या जोरावर व शहरातील काही अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करू शकलो असे भावनिक मत त्याने ह्यावेळी मांडले,काही कारणास्तव निखिल च्या भेटीकरिता येणारे यवतमाळ चे कर्तव्यदक्ष तहसीलदार कुणाल झालटे वेळेपर्यंत पोहचू शकले नाही,म्हणून प्रलय टिप्रमवार ह्यांनी फोन करून झालटे साहेबांना निखिल शी बोलणे करून देत त्यांनी सुद्धा अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी निखिल ला शुभेच्छा दिल्या,ह्यावेळी संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सचिव वसंत शेळके,अनिल तांबेकर,रवी माहुरकर,विनोद दोंदल,सागर तुमसरे,मनोज तामगाडगे,प्रशांत बोराडे,प्रकाश दीघडे,उदय सरताबे,रवी कडू,अमोल चौधरी,नारायणराव मानकर,संकल्प वनिता वाहिनीच्या संगीता टिप्रमवार,सौ मानकर, निखिल चा मित्र परिवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते

Copyright ©