यवतमाळ सामाजिक

यवतमाळ न.प. ची मान्सुनपुर्व कामे सुरू मुख्याधिकारी मडावी यांचा प्रत्यक्ष सहभाग!

यवतमाळ न.प. ची मान्सुनपुर्व कामे सुरू
मुख्याधिकारी मडावी यांचा प्रत्यक्ष सहभाग!

यवतमाळ ( प्रति ) यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांनी मान्सुनपुर्व कामाचा धडाका सुरु केला असुन सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या व मुख्य नाल्यांचे सफाई अभियान सुरू केले आहे. शणी मंदिर ते मच्छीपुल या नाल्याची छोटी गुजरी परिसरात स्वच्छता करणाऱ्या कामगारांसमवेत स्वतः नाल्यात उतरुन प्रत्यक्ष काम करीत कामगारांना निर्देश दिले. मुख्याधिकारी म्हणून त्यांच्या समर्पित कर्तव्यनिष्ठेचे जनतेकडून कौतुक केले जात आहे.
आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धती मुळे लोकप्रियता मिळवणाऱ्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यवतमाळ नगर परिषद प्रशासनात नवचेतना निर्माण करुन कामकाजात कमालीची सुधारणा घडवुन आणली आहे. प्रत्येक कामात त्या जातीने लक्ष देतात व प्रत्यक्ष सहभागी होत असतात. त्यांची ही कार्यपध्दती कामगार व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या कामासाठी न.प. स्वच्छता यंत्रणेच्या ताफ्यातील आ.नि.सर्वश्री प्रफुल्ल जनबंधु, राहुल पळसकर, प्र.आ.नि. लता गोंधळे, आनंद बिसमोगरे, वार्ड शिपाई अमित चव्हाण, दिपक चहांदे, सौरव भीसे यांचेसह सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यापूर्वी त्यांनी केलेल्या शहरातील रहदारीच्या रस्त्यावरचे अतिक्रमणे हटविण्याची कारवाई असो की, दैनंदिन भाजी बाजारातील व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी चे त्यांचे प्रयत्न असोत याबाबत नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या कार्यकाळात त्या नक्कीच या शहराचे नंदनवन करतील अशी आशा त्यांनी पल्लवित केली आहे.

Copyright ©