यवतमाळ सामाजिक

अर्जुना येथील विविध सह. स्वस्थेवर मांगुळकर गटाचे वर्चस्व प्रस्थापित.

अर्जुना येथील विविध सह. स्वस्थेवर मांगुळकर गटाचे वर्चस्व प्रस्थापित.

अर्जुना आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित अर्जुना येथील नवनिर्वाचित अध्यक्ष तथा उपाध्यक्ष यांची निवड अर्जुना येथे घेण्यात आली
येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मनोर महादेव वाघमारे यांची तर उपाध्यक्षपदी भास्कर महादेव पत्रे यांची एक मताने निवड करण्यात आली माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर तथा माजी पंचायत समिती सभापती नारायण भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमताने अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली
या संचालक म्हणून मनोहर महादेव वाघमारे, भास्कर महादेव पत्रे, उकडराव चव्हाण, मारुती श्रावण डुकरे ,जनार्दन नामदेव मिरासे ,रघुनंदन तुळशीराम तडसे, विठोबा डहाने, मारुती चंपत उमाटे नारायण बाबू सिंग राठोड विलास पांडुरंग सुरोशे,, श्रीमती द्वारकाबाई उद्धवराव बांबोडे श्रीमती शकुंतलाबाई विठोबा खडके हे कार्यकारी मंडळातील सदस्य असून यावेळी अनिल काळे सचिव कोवे सहाय्यक दिनेश जयस्वाल ओमकार चव्हाण दिनेश बांबोडे प्रामुख्याने उपस्थित होते

Copyright ©