यवतमाळ सामाजिक

दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षित मुलांवर चोरीचा आळ आणून  हजारो रुपये हडपणारा वादग्रस्त मारखाऊ पोलीस शिपाई कोण

दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षित मुलांवर चोरीचा आळ आणून  हजारो रुपये हडपणारा वादग्रस्त मारखाऊ पोलीस शिपाई कोण

तालुक्यासह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याच्या हेतूने पोलीस विभाग शहरी व ग्रामीण भागाकरिता बिट जमादार  म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांवर जवाबदारी दिल्या जाते. मात्र कुठल्याही नगराचा बिट जमादार नसणारा पोलीस शिपाई नवनवीन कारनामे करून खाकी वर्दीला मलिन करीत आहे. ह्या पोलीस शिपायाने पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार नातलग असल्याचा गैरफायदा घेत शहरातील आर्णी नाका परिसरात दबंगगिरी करण्याचा पर्यत केला होता. तो प्रयत्न या पोलीस शिपायाच्या चांगलाच अंगलट आला होता. नातलग ठाणेदाराने या तोंड फुटलेल्या पैसे खाऊ वादग्रस्त वर्दीला बदनाम करणाऱ्या पोलीस शिपायाची साधी तक्रार नोंदविण्यास मनाई केली होती .हा पोलीस शिपाई बिना नंबर प्लेट असलेल्या वाहनाने  न्यायालयीन समन्स वाटप करीत होता. अचानक कुठल्या अधिकाऱ्यांनी या पोलीस शिपायाच्या डोक्यावर हात ठेवताच या पोलीस शिपायाकडे चकचकीत नवीन वाहन आले .गेल्या 8 महिन्यापासून दिग्रस येथून पुसद येथे बदली झालेला हा पोलीस शिपाई वाटेल त्या वाटसरूला चक्क पोलीस स्टेशनसमोर उभा राहून वर्दीचा धाक दाखवून पोलीस स्टेशनच्या  आत विशेष कक्षात नेऊन लाखो रुपयांची आर्थिक लूट करीत करीत असल्याचे बोलल्या जात आहे. शहरासह तालुक्यातील  जनता त्याच्या या कृत्याने चिडचिड करीत असून चिरीमिरी जमा करणाऱ्या वादग्रस्त पोलीस शिपायामुळे त्रस्त झाली आहे. कुठलाही पदभार नसतांना ठाणेदाराची भूमिका निभवणारा हा पोलीस शिपाई खाकी वर्दीला मलिन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे .हा वादग्रस्त पोलीस शिपाई कोणाच्या आशीर्वादाने दिग्रसमध्ये ठाण मांडून बसला आहे नागरिकातून असा प्रश्न उपस्थित केला जात असून या पोलीस शिपायाची चौकशी करून कारवाई होईल की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Copyright ©