यवतमाळ सामाजिक

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सेवा कधी मिळणार ?

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सेवा कधी मिळणार ?

रुग्णावर उपचारा विणाच चालते हीवरीचे आरोग्य केंद्र.
हिवरी केंद्र,
एक महिन्या पासून आरोग्य अधिकारी विनाच.
हिवरी
हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सेवा कधी मिळणार असा सवाल परिसरातील सर्व सामान्याना पडला आहे.मागील पाच वर्षांपासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेले हिवरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांन करीता शोभेचे केंद्र ठरले आहे या केंद्रात सेवा न देता मेवा खाण्यातच प्रत्येक झन धन्यता मानत आहे या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी राहातंच नाही काही कर्मचारी राहतात तेही मनात येईल तेव्हा जातात कुणालाही रुग्णाचे घेणे देणे नाही येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यावर येथील रुग्णालयाची धुरा दिली त्यांचे वर सेवा समाप्तीच्या आदेश असतानाही आर्थिक हितसंबंधां मधून हा पदभार सोपविण्यात आल्याची वर्तुळात चर्चा केली जात आहे,मागील एक महिन्या पासुन वैद्यकिय अधिकारी नाही.या केंद्रात राजकीय दबावामुळे पूर्ण कारभार सुरू आहे या रुग्णालयास जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली त्या वेळी हि अधिकारी व कर्मचारी गैर हजर आढळून आले त्यांचे हजेरी पुस्तक जप्तहि करण्यात आले मात्र कुणावरही कारवाई तर झालीच नाही मात्र आजही त्यांच्या कामात कोणताही बदल झाला नाही त्या नंतर कार्यकारी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी ही भेट दिली या केंद्रा बाबत येथील ग्रामस्थानी अनेक वेथा मांडल्या लेखीही दिल्या त्यात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही ६ मे. ला २ वाजता पासुन एक चतुर्थ महिला कर्मचाऱ्या वेतिरिक्त कुणीच आढळले नाहि त्या ऋग्नास अखेर यवतमाळ गाठावे लागले सायकाळी ४.३० वाजता रुग्ण आले याही वेळी कुणी आढळून आले नाही,या वेळी तालुका आरोग्य अधिकारी यांना भ्रमण ध्वोनी द्वारे संपर्क करण्याच्या प्रयत्न केला मात्र उत्तर दिले नाही आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी डायरेक्ट मला फोन करू नका असा सल्ला हि या अगोदर प्रतिनिधींना दिला या वरून आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते अशी अवस्था येथील रुग्णालयाची झाली आहे.

Copyright ©