यवतमाळ सामाजिक

ग्रंथालयातील समृध्द वाचन संपदा वाचकांपर्यंत पोचविण्याचा राजमार्ग – प्राचार्य, डॉ. प्रतिभा काळमेघ

ग्रंथालयातील समृध्द वाचन संपदा वाचकांपर्यंत पोचविण्याचा राजमार्ग – प्राचार्य, डॉ. प्रतिभा काळमेघ

बाभुळगाव: दि. 5 मे 2022
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयातील वाचन सहित्याची सुजाण वाचकांशी नियमित गाठभेट होत राहायला हवी. बंदिस्त अलमारीतील वाचन साहित्याला मोकळा श्वास घ्यायचाय, वाचकांना भेटायचंय. त्यांच्याशी हितगुज करायचंय ह्याकरिता नियमित ग्रंथप्रदर्शन हा उपक्रम राजमार्ग आहे असे मत भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयातील ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्राच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनीचे उदघाटन करतांना प्राचार्य डॉ. प्रतिभा काळमेघ यांनी व्यक्त केले. ग्रंथप्रदर्शनीत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील क्रमिक, पूरक, संदर्भ, अवांतर स्पर्धापरीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग उभारणीसह इतरही विविध विषयांवरील ग्रंथसंपदेचा समावेश होता. महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी प्रत्यक्ष पुस्तक चाळून महाविद्यालयीन ग्रंथालयासाठी विविध ग्रंथांची शिफारस केली. गुणवत्तापूर्ण दर्जेदार ग्रंथसंपदा हे ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाचा प्रमुख वैशिष्ट्य असते. उपलब्ध निधीचा यथायोग्य विनियोग हेतू विचारपूर्वक ग्रंथनिवड हि समृध्द ग्रंथसंग्रह निर्मितीची पहिली पायरी आहे असे मत महाविद्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. सुधीर त्रिकांडे यांनी व्यक्त केले. संयोजक ग्रंथपाल, डॉ. संजय शेणमारे यांनी वाचकाभिमुख वाचनसंस्कृती ही काळाची गरज असून अविरत वाचनामुळे ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न समाज निर्मिती होऊ शकते असे मत व्यक्त केले. प्रसंगी प्रा. डॉ. कल्पना कोरडे व प्रा. डॉ. सविता जवंजाळ यांच्या “उपयोक्ता ग्राहक अर्थशास्त्र आणि विपणन” हया ग्रंथाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनीस प्रा. डॉ. मीना जूनघरे, प्रा. डॉ. किशोर शेंडे, प्रा. डॉ. दीपक कोटुरवार, प्रा. डॉ. दिलीप खूपसे, प्रा. डॉ. वामन विरखेडे, प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार, प्रा. डॉ. चंद्रशेखर ठाकरे, प्रा. डॉ. युवराज मानकर, प्रा. डॉ. विकास टोने, प्रा. डॉ. गजानन माने, प्रा. डॉ. निलेश सुलभेवार, प्रा. सुनिल ईश्वर, प्रा. पायल चांदोरे यांचेसह परिसरातील ग्रंथप्रेमी ग्रामस्थ, पालकांनी सुद्धा भेट दिली. ग्रंथप्रदर्शनी आयोजनासाठी एस. चांद प्रकाशनचे प्रतिनिधी रविंद्र ठवरे व साई ज्योती प्रकाशन, नागपूरचे प्रतिनिधी . गणेश राऊत यांनी सहकार्य केले. ग्रंथप्रदर्शनी यशस्वीतेकरिता संजय मदने मुख्य लिपिक, चेतन मेश्राम, अनंता दिघाडे, रमेश उईके, श्रीमती वनमाला लढी यांनी अथक प्रयत्न केले.

Copyright ©