यवतमाळ सामाजिक

पोलीस उपनिरीक्षका वरील खोटे गुन्हे मागे घ्या: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेेची मागणी

पोलीस उपनिरीक्षका वरील खोटे गुन्हे मागे घ्या: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेेची मागणी

पुसद/ पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याने गवळी समाज आक्रमक होऊन पोलीस उपनिरीक्षका वरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद येथे रेल्वे विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले किशोर मलकु नाईक आपल्या राहत्या घरी संभाजी नगर औरंगाबाद येथे घरात मुलाचा वाढदिवस साजरा करत होते त्यावेळी ब्ल्यूटूथ वर अगदी कमी आवाजामध्ये वाढदिवसाचे गाणे वाजवीत असताना द्वेषपूर्ण भावनेने काही असंतुष्ट समाजकंटकांनी पोलिसांवर दबाव टाकून किशोर नाईक यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या च्या गुन्हा खोट्या पद्धतीने दाखल केला या घटनेने सर्वत्र गवळी समाजामध्ये असून त्यांनी सदरचे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांना निवेदन सादर केले यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी निवेदनावर महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद चे तालुकाध्यक्ष अमोल साखरे, तालुका उपाध्यक्ष आशिष साखरे, तालुका सचिव विनोद पुलाते, तालुका कोषाध्यक्ष संतोष कोकणे, तालुका कार्याध्यक्ष दत्‍तराव काळे, तालुका सहसचिव ज्ञानेश्वर गादेकर, माजी माजी तालुकाध्यक्ष शरद कुबडे पाटील, माजी उपाध्यक्ष साहेबराव साखरे, एडवोकेट राजकुमार धाड, जितेंद्र लांडे, शंकरराव ढोकणे, दिगंबर पुलाते, प्रफुल फुके, योगेश मंदाडे, अविनाश ढोकणे, दिगंबर मंदाडे, डॉक्टर रामकृष्ण साखरे, श्रीकृष्ण मंदाडे, हरिभाऊ पुलाते, एकनाथ पुलाते, पवण भालेराव, अजिंक्य पुलाते, रामेश्वर बोरकुट, श्यामसुंदर ढोकणे, दिगांबर भालेराव, अरुण पुलाते, विलास फूके, किशोर काळे, शरद काळे, आकाश पुलाते, पवन भाकरे, पिंटू फुके, देविदास साखरे, नामदेव फुके, शिव भाकरे, अरुण मोटे, तेजस आबाळे, पवन ढोकणे, पुंडलीक ढोकणे, पुंडलीक अवसरे, वल्लभ मंदाडे, ओम पुलाते, ओंकार सुपले, विठ्ठल पुलाते, ओमप्रकाश पुलाते, गौरव ढोकणे, जगदिश भालेराव, संदीप लांडे, संदीप पुलाते, शैलेश मंदाडे, कपिल साखरे, नंदू मंदाडे, नितेश ढोकणे, जयदेव पुलाते मारोती करण, किरण पुलाते, नरेन्द्र पुलाते, तेजस माटे, रमेश साखरे, पांडुरंग ढोकणे, मंगल साखरे, वैभव आबाळे नाशिक यांच्यासह असंख्य महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©