यवतमाळ सामाजिक

आर्णी च्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनीअदा केली ईद-उल-फितरची नमाज

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम

आर्णी च्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनीअदा केली ईद-उल-फितरची नमाज

पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिल्या आर्णी करांना शुभेच्छा
पवित्र रमजान महिन्याचे ३०रोजे (उपवास) पूर्ण केल्यानंतर पूर्ण केल्यानंतर रमजान ईद सामूहिकपणे साजरी करण्यात आहे जिल्हा दौऱ्यावर आलेले पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दर्गा इदगा येथे गुलाबाचे फुल देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या
आर्णी शहरातील जामा मज्जीद चौक शास्त्री नगर मुबारक नगर तसेच शहरातील सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन बाबा कंबल्पोष दर्गा येथे असलेल्या ईदगाह मैदानावर सामूहिक ईद-उल-फितर ची नमाज अदा केली दरम्यान मौलाना हसन रीझवी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले दोन वर्षाच्या दीर्घकाळानंतर नमाज अदा करण्यात आली असून त्यात अनेक बांधवात उत्साह वाटत होते नमाज अदा केल्या नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांनी आपल्या ताफ्यासह बंदोबस्त लावला. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा करण्यात आली.

Copyright ©