यवतमाळ सामाजिक

शाळेतील गट्टू निकृष्ट दर्जाचे तेही अधर बसविल्याने निघण्यास सुरुवात

शाळेतील गट्टू निकृष्ट दर्जाचे तेही अधर बसविल्याने निघण्यास सुरुवात

येथील जिल्हा परिषद शाळेत बसविण्यात येत असलेले गट्टू हे प्रथमच हलक्या प्रतीचे असून पाय दिला की फुटत आहे आणि बसविण्यात येत आहे तेही मुरूम टाकून त्याचेवर बसविण्यात आले असल्याने या कामात प्रचंड गैर प्रकार होत असल्याचे दिसून येत समोर बसविणे आणि बसविण्यात आलेले गट्टू निघत आहे विशेष म्हणजे येथील होणारे बांधकाम मागील सात वर्षा पासून केवळ एकाच वेक्तीच्या माध्यमातून करीत असल्याने गावात होणारे बांधकाम पुर्णतः निकृष्ट दर्जाचे आहे याचे अनेक पुरावे दिसून येत आहे, हिवरी येथील काढण्यात येत असलेले प्रत्येक टेंडर म्यानेज करूनच काढल्या जात असल्याने या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे परंतु या प्रकरणी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात असल्याने याची चौकशी कोण करेल हा यक्ष प्रश्न असून या पूर्वीच्या गैर कामातील प्रकरणाच्या एकही चौकश्या झाल्या नसल्याने या महा आघाडी सरकार मध्ये गैर प्रकाराला जास्त पाठबळ मिळत असल्याचे दिसून येते. गाव पातळीवरील गैर होत असल्याचे निदर्शनास आले आहे विशेष म्हणजे यात अनेकांचे हात गुंतले असल्याने बोगस बांधकामास परवानगी देण्यात येते व काम पूर्ण होण्या आधीच एम बी तयार केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे कॉलिटी कंट्रोल मधून कामाची पाहणी न करता बाधकाम चांगले असल्याचे प्रमाण पत्र हि दिल्या जाते.या प्रकरणी विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदस्य व ग्रामवशियान कडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Copyright ©