यवतमाळ सामाजिक

एकोप्याची पंरपरा जपत सावळी सदोबा येथे रमजान ईद साजरी

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

एकोप्याची पंरपरा जपत सावळी सदोबा येथे रमजान ईद साजरी

सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथे मुस्लिम बांधवाकडून नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लीम ऐक्याची परंपरा जपत,ईद के दिन गले मिलने आजा म्हणत,परस्परांना अलींगण देत,रमजान ईद साजरी करण्यात आली, रमजान पर्व हा एक महिन्याचा काळ मुस्लीम बांधवासाठी पवित्र आणि उत्सवाचा असतो,मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोणामुळे मुस्लिम बांधवांना आपला हा पवित्र सण साजरा करता आला नाही, मात्र शासनाने या वेळेस सर्व निर्बंध हटवल्याने,मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते,त्यामुळे रमजान ईद निमित्त सावळी सदोबा येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सकाळी सावळी सदोबा व परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करण्यात आली,
यावेळी पारवा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री.विनोद चव्हाण,गजानन गजभारे, तुषार जाधव,हेमंत राठोड,यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन गळा भेट घेतली व ईदच्या शुभेच्छा दिल्या.
जामा‌ मस्जिद कमेटी चे अध्यक्ष जाऊद्दीन सर्वे,फैज मस्जिद कमेटी चे अध्यक्ष माजी अहेमद खान,मौलाना सिराज साहेब,यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर,आलम खान,हाजी‌ निजामोद्दीन सर्वे,कूषी वैभव जिनींगचे अध्यक्ष बक्षुमहंमद सर्वे, सैय्यद गफारभाई ,सावळी सदोबा चे माजी सरपंच अहेमद तंवर,अयुब कुरेशी,अजिस खान,फीरोज खान,जकाऊल्ला खान,आशिष खान, निसार सर्वे, युनुस खान, युसुफ खान,आसीफ सुमार,जावेद खान,शेख अन्वर,शेख राजीक,सय्यद लतीफ,राजु लखपती,शकीलभाई,कालुभाई,जावेद शेख,अमिर पठान,यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Copyright ©