यवतमाळ सामाजिक

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्य भव्य मोटर सायकल रॅली

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्य भव्य मोटर सायकल रॅली

वीरशैव हितसंवर्धक मंडळ,यवतमाळ द्वारा आयोजीत जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वा जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी महात्मा बसवेश्वर चौक येथून भव्य मोटर सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. लिंगायत समाजातील बांधव आणि भगिनी
विशिष्ट पेहरावामध्ये या मोटर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले
होते. ढोल नगाऱ्यासह शहराच्या विविध भागामध्ये फिरून ही रॅली महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथे समाप्त झाली. ह्या प्रसंगी मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अशोक मेनकुदळे, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर,सचिव निलेश शेटे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ विद्या बेलोरकर, बसव क्लबच्याअध्यक्षा सौ. कल्पना देशमुख, बाळासाहेब दिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सर्व समाजबांधव महात्मा बसवेश्वरांची जयंती शासन स्तरावर साजरकरण्याकरिता जिल्हाधिकारकार्यालय येथे मार्गस्थ झाले. आज सांयकाळी ७ वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे.

Copyright ©