यवतमाळ सामाजिक

प्लास्टिक निर्मूलन करून,महाराष्ट्र दिन साजरा

प्लास्टिक निर्मूलन करून,महाराष्ट्र दिन साजरा

संकल्प फाउंडेशन च्या वतीने दर रवीवारला प्लास्टिक निर्मूलन शाळा हा उपक्रम घेऊन सकाळी 7 ते 9 ह्या दोन तासात परिसरातील प्लास्टिक वेचून नगर प्रशासनाच्या सुपूर्द केल्या जाते,आज महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त जिल्हा कारागृह यवतमाळ येथे प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले, संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, एक हात मदतीचा, वन्य जीवासाठी व पशुप्रेमी ग्रुप चे तब्बल असे तब्बल 72 सदस्यांनी जिल्हा कारागृह यवतमाळ चा परिसर प्लास्टिक निर्मूलन करून स्वच्छ केला, महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहनासाठी कारागृह अधीक्षक कीर्ती ताई चिंतामणी व कारागृह प्रशासना समवेत ह्या सर्व संस्थांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला ह्यावेळी भल्या सकाळी तब्बल 18 पोते भरून प्लास्टिक निर्मूलन केल्याबद्दल कीर्ती ताई चिंतामणी ह्यांनी सर्व संघटनांचे कौतुक केले,परिसर स्वच्छ झाल्यानंतर ,ह्या परिसरात प्लास्टिक चा कुणीही वापर करू नये,केल्यास 5000 ते 25000 रु दंड वसूल केला जाईल अश्या आशयाचे फलक संबंधित परिसरात लावण्यात आले,ह्या प्लास्टिक निर्मूलन
मोहिमेकरिता संकल्प फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके,रवी माहुरकर,नितीन माटे,रवी ठाकूर,विनोद दोंदल,प्रशांत एम्बरवार, मनोज तामगाडगे,प्रकाश दीघडे,राजेंद्र गावंडे,सुनील संकोचवार, राहुल दाभाडकर,चांगदेव ढव स,उदय सरतापे,निलेश ठोंबरे,अरुण चंदरे,महादेव काचोरे,दीपक लोखंडे, संकल्प वनिता वाहिनीच्या संगीता टिप्रमवार, निकिता बाविस्कर, वर्षा गावंडे,कोमल अडेवार,एक हात मदतीचा,वन्य जीवासाठी ग्रुप चे,दिनेश तिवाडे,अर्जुन पारवेकर,कुणाल सीडाम,अभिषेक सीडाम,विक्की कोटनाके पशुप्रेमी ग्रुप चे सुमेध व मित्र परिवार उपस्थित होते

Copyright ©