यवतमाळ सामाजिक

अस्तित्व फाउंडेशन द्वारा जिल्हा कारागृहामध्ये भव्य मल्टीस्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर

अस्तित्व फाउंडेशन द्वारा जिल्हा कारागृहामध्ये भव्य मल्टीस्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर

या शिबिराचे आयोजन आरोग्य समितीच्या अध्यक्षा डॉ.अंजली गवार्ले (मूळव्याध भगंदर तज्ञ, गवारले हॉस्पिटल) यांनी केले. कारागृहातील कैद्यांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी त्यांनी विविध तज्ञ डॉक्टरांची टीम आमंत्रित केली. या शिबिरात अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा अलका कोथळे तथा सचिव डॉक्टर कविता करोड देव बोरकर, सौ भरती जानी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी जिल्हा कारागृहासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना महिला दिनानिमित्त राज्यपालहस्ते पुरस्कार मिळाला होता यानिमित्ताने चिंतामणी मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन तसेच अस्तित्व फाउंडेशन च्या संपूर्ण टीम द्वारे कीर्ती चिंतामणी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा लाभलेल्या सर्व तज्ञ डॉक्टरांना
अध्यक्षा अलका कोठले, कीर्ती चिंतामणी,डॉ अंजली गवार्ले यानी सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.. डॉक्टर अनिल पटेल ज्येष्ठ श्रेष्ठ नाक कान घसा तज्ञ यांनी वयाच्या सत्तर वर्षापर्यंत अविरत दिलेल्या सेवेबद्दल सर्व डॉक्टर्सनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉ. कविता बोरकर या जिल्हा कारागृहामध्ये नियमित योग कैद्यांना योग शिबिराचे आयोजन करतात त्या प्रित्यर्थ आरोग्य समितीद्वारे त्यांचाही सत्कार करण्यात आला करुणा धनेवार या आपण जिल्हा कारागृहातील कैदी
महिलांना शिवणकला धडे देतात त्यांच्या या कार्याला बद्दल त्यांचाही आरोग्य समितीद्वारे सन्मान करण्यात आला या शिबिरामध्ये एकूण 500कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात विविध तज्ञां द्वारे करण्यात आली तसेच त्यांना सर्व प्रकारचे व्याधि नुसार औषधी वाटप पण करण्यात आले …….
या शिबिरामध्ये डॉ.अनिल पटेल नाक कान घसा तज्ञ डॉ. भरत राठोड हृदय रोग तज्ञ डॉक्टर ; डॉ.महेश चव्हाण अस्थिरोग तज्ञ ; डॉ.ओमप्रकाश जळमकर छाती रोग तज्ञ ; डॉ. पियुष कोटगिरवार जनरल फिजिशियन ; डॉ.सुरेखा बरलोटा स्त्री रोग तज्ञ ;डॉ स्वाती जटले त्वचा रोग तज्ञ; डॉ अंजली गवार्ले मुळव्याध भगंदर तज्ञ ;डॉ. कविता बोरकर आयुर्वेद तज्ञ ;डॉ.निकिता चव्हाण होमिओत्वचारोग तज्ञ ;डॉ. विद्या नागपुरे आयुर्वेदिक तज्ञ ;डॉ स्नेहा लंगडे आयुर्वेद तज्ञ; डॉ. कल्याणी गुलहाने नेत्ररोग तज्ञ तसेच कारागृहाचे डॉ आतिश गजबिए,डॉ अनुप गोरे दंतरोग तद्न्य या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच अस्तित्व ची संपूर्ण टीम अध्यक्ष अलका कोथळे सचिव डॉक्टर कविता बोरकर ;कोषाध्यक्ष करुणा धनेवार; डिंपल नक्षणे ;रितू गायकवाड ; भावना लेडे ;भारती जानी ;जयश्री धनस्कर; सर्वांचा धनश्री जवके यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच जिल्हा कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी मॅडम आणि संपुर्ण कारागृहाचे कर्मचारी या सर्वांचे ही मोलाचे सहकार्य लाभले अशाप्रकारे हा कार्यक्रम अतिशय भव्य स्वरूपाचा झाला …

Copyright ©