यवतमाळ सामाजिक

तहसील कार्यालय परिसर प्लास्टिक मुक्त

तहसील कार्यालय परिसर प्लास्टिक मुक्त

संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी व एक हात मदतीचा ह्या सामाजिक संघटनांच्या वतीने मागील महिनाभरापासून यवतमाळ शहर प्लास्टिक मुक्त व्हावे ह्या करिता प्रयत्न सुरु आहेत,आर्णी मार्गावरील वनवासी मारोती परिसरापासून सुरू झालेल्या ह्या उपक्रमाचा आजचा 6 वा शनिवार होता,अनेक ठिकाणी प्लास्टिक चे खच वर्षानुवर्षे पडून आहेत,पर्यावरणासाठी निर्माण होणाऱ्या ह्या धोक्याला ही अंशी आळा घालून प्लास्टिक न वापरण्यासंबंधीची जनजागृती सुद्धा ह्या माध्यमातून करण्यात येत आहे, आज सकाळी 7 ते 9 ह्या दोन तासांच्या श्रमदानाकरिता नेहमीच अग्रक्रमाने कार्य करणारे तहसीलदार कुणाल झालटे ह्यांनी स्वतः श्रमदान केले,त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी वृंद हे सुद्धा ह्यावेळी उपस्थित होते,ह्या प्लास्टिक निर्मूलन केल्यानंतर तहसिल कार्यालयाच्या परिसरात कुणी प्लास्टिक चा वापर करतांना वाढल्यास 5000 ते 25000 रु दंड मुख्याधिकारी नगर परिषद ह्यांच्या आदेशाचे फलके परिसरात लावण्यात आले,तसेच एक हात मदतीचा,वन्य जीवासाठी ह्या संस्थेच्या वतीने पक्षीपात्र कार्यालय परिसरात लावण्यात आले,ह्यावेळी संकल्प फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके,रवी माहुरकर,रवी ठाकूर,आशिष महल्ले,विनोद दोंदल,अनिल तांबेकर,प्रशांत येम्बरवार,मनोज तामगाडगे, गजेंद्र उन्हाळे,नितेश यादव,सागर तुमसरे,प्रकाश दीघडे, राजेंद्र गावंडे,संदीप बेलखेडे,सुनील संकोचवार, निलेश वाभीटकर,चांगदेव ढवस,उदय सरतापे,किशोर नरांजे,राजू देशमुख,संकल्प वनिता वाहिनीच्या,ज्योती डब्बावार, सीमा सोळंके,संगीता टिप्रमवार, कु कोमल अडेवार, कु निकिता बाविस्कर,वर्षा पडवे,तर एक हात मदतीचा, वन्य जीवासाठी ग्रुप चे दिनेश तिवाडे,तुषार सुलभेवार, राहुल सीडाम व इतर नागरिक मोठ्या संख्येने ह्या श्रमदानासाठी।उपस्थित होते

Copyright ©