Breaking News यवतमाळ

जोडमोहा वनविभागातील लाकडाच्या गनजीला आग,लाखोंचे सागवान जळून खाक

उपसंपादक पवन धोत्रे

जोडमोहा वनविभागातील लाकडाच्या गनजीला आग,लाखोंचे सागवान जळून खाक

हि आग लागल्याचे नेमके कारण समोर आले नसून आगी बाबत संशय वेक्त करण्यात येत आहे.

वनविभाग यवतमाळ मध्यवर्ती काष्ट आगार जोडमोहा येथे भीषण आग लागल्याने येथील सागवान जळून खाक झाले असता यवतमाळ येथून तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण केले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले व विठ्ठलवाडी,अंजनी, जंगलक्षेत्राला वणव्याने घेरल्याने यात कोट्यवधींची वनसंपदा नष्ट होत आहे . आगीच्या घटनांमुळे वन्यप्राणी संकटात सापडले असून , याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे . जंगलक्षेत्रात दरवर्षीच उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडतात . त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जाळरेषा हा पर्याय आहे . तरीदेखील आगीच्या घटना घडतात . त्याला वणवा असे गोंडस नाव देऊन लिपापोती केली जाते मात्र , या वनसंपदेवर तस्करांची वक्रदृष्टी पडली यात अनेकांचे हात असल्याचाही संशय वेक्त केल्या जात आहे. या घटने वनविभागातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची बाब लपून नाही . वर्षभर सागवानाची कत्तल केली जाते आणि या घोळावर पांघरून घालण्यासाठी वणवा लागतो , अशी चर्चा वनवर्तुळातच ऐकायला मिळते . यंदा जोडमोहा विठ्ठलवाडी,अंजनी या जंगलक्षेत्रात वणवा लागल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत . यात कोट्यवधींची वनसंपदा नष्ट झाली . आधीच जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राण्यांनी गावाकडे
धाव घेतली आहे . वन्यप्राणी जलस्रोत उपलब्ध असणाऱ्या स्थळी स्थलांतरित होत असल्याने शिकारीही आपला निशाणा साधत आहे . त्यातच जंगलात जे काही वन्यप्राणी आहेत . वणव्यामुळे त्यांना सैरभैर पळावे लागत आहे . शिवाय दुर्मिळ वनस्पती नष्ट होत असल्याचे सांगितले जाते . ही बाब गंभीर असतानादेखील वरिष्ठ पातळीवर योग्य ती दखल घेतली जात नसल्याची ओरड सुरू आहे .वनविभागाच्या दुर्लक्षित पना मुळे व गैर प्रकार लपविणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ काय कारवाई करते या कडे अनेकांचे लक्ष लागले असून सतत वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने योग्य ते पाऊल तातडीने उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे .

Copyright ©