यवतमाळ सामाजिक

श्रीमती सुशीला रतनचंद बुंदेला यांचे निधन

श्रीमती सुशीला रतनचंद बुंदेला यांचे निधन

यवतमाळ – भारतीय जैन संघटनेचे माजी विदर्भ अध्यक्ष विजय कुमार बुंदेला,प्रदिप बुंदेला यांच्या मातोश्री सुशीला रतनचंद बुंदेला (वय 78 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9:10 च्या सुमारास निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार पांढरकवडा रोड वरील हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता करण्यात आले.श्रीमती सुशीला रतनचंदजी बुंदेला यांच्या पश्चात मुलगा मोठा मुलगा प्रदीप बुंदेला,भारतीय जैन समाज संघटनेचे माजी विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला,नातवंड असा आप्त परिवार आहे. 1 मे 2022 रोजी दिनांक 9:30 वाजता गुणअनुवाद सभेचे आयोजन करण्यात आले असून ही सभा राजेंद्रनगर येथील देवजी निसर जैन धर्मस्थानात पार पडणार आहे तरी समाज बांधवांनी याला उपस्थित रहावे असे कळविण्यात आले तसेच यावेळी माजी आमदार कीर्ती बाबू गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. प्रकाश चोपडा, डॉ. रमेश खिवसरा, अनिल खिवसरा, अजय मुंधडा, अशोक गांग, प्रमोद श्रीमाल, नरेंद्र कोठारी, मनोज जयस्वाल, विवेक अर्गुलवार, प्रलय टिप्रमवार, सुकांत वंजारी, अंचल झाडगावकर, अजय किन्हीकर, किरण कोरडे तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©