यवतमाळ सामाजिक

महादीप ऑनलाईन टेस्ट साठी शिक्षण विभाग झरी जामणी तर्फे सत्कार सोहळा

महादीप ऑनलाईन टेस्ट साठी शिक्षण विभाग झरी जामणी तर्फे सत्कार सोहळा

जिल्हा परिषद यवतमाळ मार्फत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत महादीप परिक्षा आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये विद्यार्थ्यांची महादीप परिक्षेची तयारी व्हावी म्हणून कैलाश गव्हाणकर, सुरेखा ठाकरे,आशा कोवे यांनी ऑनलाईन टेस्ट तयार करून विद्यार्थ्यांना व शिक्षक ग्रुपमध्ये पाठविल्या त्याचा फायदा यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना झाला. अशा या तीन शिक्षकांचा सत्कार झरी येथे दि.२७/४/२०२२ रोजी करण्यात आला. यामध्ये कैलाश गव्हाणकर अर्जुना पंस यवतमाळ, श्रीमती सुरेखा ठाकरे पिंपरीरोड पंस पांढरकवडा, श्रीमती आशा कोवे पंस वणी यांचा शाल,श्रीफळ, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन पंचायत समिती झरी जामणीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर साहेब व गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे साहेब यांनी यथोचित सत्कार केला.
झरी जामणी या आदिवासी बहुलक तालुक्यातील २१ विद्यार्थी अंतिम परीक्षेपर्यंत पोहचले पण विमानवारी पर्यंत पोहचू शकले नाहीत.ते विद्यार्थी नाउमेद होऊ नयेत म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार केला.
तसेच ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची महादीप परिक्षेची तयारी करुन घेतली त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती हर्षदा चोपणे यांनी केले

Copyright ©