यवतमाळ सामाजिक

रोजगार हमीतून दशवार्षिक नियोजन

रोजगार हमीतून दशवार्षिक नियोजन

किन्ही येथील ग्रामपंचायत चा सर्वसमावेशक आराखडा तयार करून प्रत्येक कुटुंबाला सुखी कसे करता येईल याकरिता नियोजन बद्ध काम करावे असे आवाहन तहसीलदार कुणाल झालटे यांनी केले किन्ही येथील ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दशवार्षिक नियोजन आराखडा प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार कुणाल झालंटे यांनी केले यावेळी ज्ञानेश्वर टाकरस गटविकास अधिकारी,अरुण भोयर विस्तार अधिकारी,
शेखर विरुटकर उपजिल्हाधिकारी रोहयो,
अमोल शंभरकर जिल्हा परिषद यवतमाळ नरेगा (पीएम), बालाजी चव्हाण ए पी ओ, स्नेहल खाडे ए पी ओ, नितीन ठाकरे पीटीओ, सुबोध दुबे पी.टी.ओ, शैलेश शिरभाते पी. टी. ओ. आशिष किन्हीकर पीटीओ, विभा नागभिडे पीटीओ, अभिजीत गुल्हाने सीडी ईओ, इत्यादि उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत ग्रामपंचायत आदर्श वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात एका ग्रामपंचायत चा दहा वर्षाचे नियोजन आराखडा तयार करण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आले आहे राज्याचे रो.ह.यो. चे मुख्य सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून दशवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे गावातील प्रत्येक कुटुंबाचे संरक्षण करून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कुटुंबास रोजगार हमी योजनेअंतर्गत 262 कामापैकी जास्तीत जास्त कामांचा लाभ घेऊन कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावून कुटुंबास सुखी करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे त्यासोबत गावांमध्ये सार्वजनिक स्वरूपाची कामे घेऊन गावांमध्ये स्वस्थ विकास कामे करून गावाचा विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने तुन ार्षिक नियोजन केल्यास गावातील प्रत्येक कुटुंबाला लाभ देणे शक्‍य होणार आहे यामध्ये ज्या कुटुंबांना रोहयोच्या माध्यमातून जॉब कार्ड पाहिजे आहे त्या कुटुंबांना जॉब कार्ड वाटप करण्यात येणार आहे पुर्वी रोजगार हमी योजनेचा एका वर्षाचा आराखडा तयार करण्यात येत होता आता तोच आराखडा दहा वर्षात होणार आहे शिवाय लाभार्थ्यांना एकापेक्षा अधिक कामाचा लाभ घेऊन स्वतःला समृद्ध करता येणार आहे दस वार्षिक योजनेच्या वेळी ग्रामपंचायत पंचायत समिती तहसील कार्यालये व इतर तालुकास्तरीय यंत्रणा यांची भूमिका काय असेल याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीस वार्षिक नियोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत चे नियोजन हाती घेण्यात येईल दस वार्षिक नियोजनाचा द्वारे कुटुंब समृद्ध व गाव समृद्ध करण्याची संकल्पना अमलात आणण्यात येणार असल्याचेही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले यावेळी या कार्यक्रमास गावातील सचिव आर.एस.दुधे , ग्रा.पं.किन्ही, सरपंच ज्ञानेश्वर गोहाडे , उपसरपंच प्रमोद नाटकर,कृषी सहाय्यक, तलाठी, वन विभाग, रेशीम उद्योग, ग्रा प सदस्य गण (सर्व), सामाजिक वनीकरण, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, रोजगार सेवक, बचत गट (सर्व) या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक — स्नेहल खाडे व बालाजी चव्हाण यांनी केले

Copyright ©