यवतमाळ सामाजिक

ग्रामपंचायत सदस्य कोकिळा कांबळे यांच्या निलंबनाला स्थगिती

ग्रामपंचायत सदस्य कोकिळा कांबळे यांच्या निलंबनाला स्थगिती

ग्रामपंचायत शेंबाळ पिंपरी येथील सदस्य कोकिळा गौतम कांबळे यांना तीन अपत्य असल्याच्या कारणाने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश २९, एप्रिल २०२२ जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पारित केला होता या आदेशाविरुद्ध अपील अर्ज सादर करून अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सदर आदेशाची प्रतिवादी यांचा अर्ज मंजूर करून अर्जदार यांना महाराष्ट्र ग्रामीण ग्रामपंचायत अधिनियम कलम १४(१)(ज-१) अन्वेय ग्राह्य ठरवून शेंबाळ पिंप्री ग्रामपंचायत सदस्य या पदाकरिता अपात्र घोषित केले होते, अर्जदार यांचे वकील ॲड.प्रेम दिलीप दामोदर यांनी २२ एप्रिल रोजी अपील दाखल केली त्यादरम्यान प्रेम दामोदरआणि एम.देशमुख यांनी युक्तिवाद करून व प्रस्तुत प्रकरणात या वेळेत क्यावेटअर्ज दाखल नाही कनिष्ठ न्यायालयाच्या रोज नाम्याच्या अवलोकना अंती प्रकरणास आव्हान करीत आदेशाची सुनावणीच्या प्रथम दिनांक १८ मे. २०२२ या निलंबनाला स्थगिती दिली अप्परआयुक्त अमरावती यांच्या कडे हि अपील करून ॲड. प्रेम दिलीप दामोदर ॲड. एम. देशमुख यांनी विशेष युक्तिवाद करून ही स्थगिती मिळविली असल्याने या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Copyright ©