Breaking News यवतमाळ

चाकूच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

बेला प्रतिनिधी कैलास साठवणे

चाकूच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

लग्न समारंभात गेलेल्या एकाच गावातील दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे वाद झाला . हा वाद विकोपास जाताना एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले ही घटना बेला (उमरेड) पोलीसठाण्या अंतर्गत अमघाट येथे दि 25 रात्री 7 वाजता सुमारास घडली
कमलाकर वसंत एसनसुरे (29) असे जखमी चे नाव तर लक्ष्मण दिलीप ताडाम (३२) असे आरोपीचे नाव आहे दोघेही आमघाट ता. उमरेड येथील रहिवासी असून त्यांची आपसात ओळख आहे . आमघाट येथील एका तरुणा चे वदोडा येथे लग्न असल्याने दोघेही लग्नात गेले होते. त्या लग्नात दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे भांडण झाले होते .
वाद मिटल्यानंतर दोघेही वराती सोबत MH 31 / B N 1930 क्रमांकाच्या गाडीने आम घाट येथे परत आले
कमलाकर गाडीतून खाली उतरताच लक्षमन ने चिडून त्याच्या पाठीमागे कमरेवर चाकु ने वार केला कमलाकर वळताच लक्ष्मण ने त्याच्या दोन्ही हात व छातीवर चाकूने वार केला .
यात कमलाकर गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला लगेच बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेथे प्रथम उपचार केल्या नंतर त्याला नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले या प्रकरणी बेला पोलीसानी भादंवि 307 गुन्हा नोंदवून आरोपीस लक्ष्मण ला अटक केले

Copyright ©