यवतमाळ सामाजिक

घाणेरडे पाणी पितात, रुग्ण व त्याचे नातेवाईक शासकीय रुग्णालयातील भीषण वास्तव,

घाणेरडे पाणी पितात, रुग्ण व त्याचे नातेवाईक शासकीय रुग्णालयातील भीषण वास्तव,

संकल्प फाउंडेशन ने केली अधिष्ठाता कडे तक्रार

संकल्प फाउंडेशन च्या वतीने दर रविवारी प्लास्टिक निर्मूलन केल्या जाते,रविवारला शासकीय रुग्णालय परिसरात प्लास्टिक निर्मूलनाचा उपक्रम सुरू असतांना, रुग्णालय परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीभवती प्लास्टिक चा खच पडलेला दिसला,आजूबाजूचा परिसर दुर्गंधीयुक्त होता,पाण्याच्या टाकीतून पाणी अक्षरशः धबधब्यासारखे कोसळत होते,ह्याचा व्हॉल्व बंद करण्याच्या उद्देशाने संकल्प चे सदस्य टाकीवर चढले असता संबंधित दृश्य पाहून चक्रावून गेले,शेवाळ,माती,पाण्याचा तांबूस रंग,बारीक कृमी असलेले हे पाणी अक्षरशः रुग्ण व परिसरातील नागरिक पिट होते, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरे नामक शासकीय कामचऱ्याला बोलावून सर्व दृश्य त्यांच्या नजरेत आणून दिले,त्यांनी लागलीच आजूबाजूच्या परिसराची थातुरमातुर सफाई कामगारांकडून स्वच्छता करून घेतली,परंतु पाण्याची टाकी स्वच्छ करण्याकरिता असमर्थता दाखविल्यामुळे आज संकल्प फाउंडेशन च्या वतीने अधिष्ठाता डॉ फुलपाटील ह्यांना तक्रार वजा निवेदन देण्यात आले व संबंधित कंत्राटदार वा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली,ह्यावेळी संकल्प फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके,उपाध्यक्ष अनिल तांबेकर,सहसचिव रवी माहुरकर,शहराध्यक्ष विनोद दोंदल,जिल्हा कार्यकारिणी सदस्य,रवी ठाकूर व आशिष महल्ले उपस्थित होते

Copyright ©