यवतमाळ सामाजिक

यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसील येथे पाणपोई ची व्यवस्था

सहसंपादक गोकुल खडसे

यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसील येथे पाणपोई ची व्यवस्था

पुर्वी रनरन्त्या उन्हाळयात माणसाची तहान भागवण्यासाठी खुप पाणपोई सुरु होत्या.आता अक़्वा पाण्या मुळे पाणपोई कमी झाल्यात,लोक पाऊच,पाणी बौटल विकत घेउन आपली तहान भागवतात….
पण खुप ठिकानी कामानिमित्य ( उदा.तहसिल कार्यालय ) येणारा ग्रामीण वर्गातील गरिब लोकासाठी पाणी विकत घेणे म्हणजे त्याना भुर्दड च म्हणा .
अश्याच गरिब लोकाची सेवा करण्यासाठी तहसिल कार्यालय उपविभागीय भुमी अभिलेख कार्यालय यवतमाळ समोरील हनुमान मंदीर जवळ फ़िल्टर पाणी (ब्यारल) ची पाणपोई यवतमाळ शहर काँगेस कमिटी च्या वतीने दि. 26/4/22 पासून सुरू करण्यात आली. पणीपोई चे उद्घाटन लोकनेते मा.ना. बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले , या प्रसंगी चंदू भाऊ चौधरी अध्यक्ष शहर काँगेस कमिटी यवतमाळ तथा नगरपरिषद विरोधी पक्ष नेते नेते, श्री अजय किन्हीकर सचिव शहर काँगेस कमिटी यवतमाळ, श्री. आशिष महल्ले, व उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय साहाय्यक राऊत मॅडम ,डोंगरे मॅडम, तसेच लांजेवार भाऊ, वंजारी भाऊ, नितीन कदम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थीत तहसील परिसरातील सर्व अधिकारी , पदाधिकारी व नागरिकांनी सदर उपक्रमाची प्रशंसा केली. सदर उपक्रमासाठी अजय किन्हीकर व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

Copyright ©