यवतमाळ सामाजिक

ग्रामसेवक शिक्षकास आदेश देतो तेव्हा

प्रतिनिधी दारव्हा विकी गजलवार

ग्रामसेवक शिक्षकास आदेश देतो तेव्हा

पंचायतराज दिनाच्या दिवशी गट ग्रामपंचायत सावळा येथील विशेष ग्रामसभा तहकूब

दारव्हा तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावळा येथील पंचायत राज दिनाच्या दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते मात्र गट ग्रामपंचायत सावळा येथे ग्रामसेवक च ग्रामसभेला न आल्यामुळे येथील ग्रामसभा तहकूब करण्यात आली विशेष असे की ग्रामपंचायत सरपंच व सचिवांनी संगनमत करून ही ग्रामसभा होऊ नये म्हणून वेळेवर शाळेच्या शिक्षाकाला ग्रामसभा घेण्याचे फोन वरून आदेश दिले असल्याचा प्रकार समोर आला आहे, विशेष म्हणजे शिक्षकास ग्रामसभा काय असते यातील काहीच कळत नसल्याचे सोष्ट सांगितले आणि याबाबत सबंधित शिक्षकास पंचायत समिती स्तरावर कोणतेही पत्र अथवा आदेश नाही त्या मुळे मी कशी ग्रामसभा घेऊ शकतो असे सांगितले तर सरपंच व काही पदाधिकारी लोकांनी व शिक्षण विभागाचे वरिष्ठ लोकांनी शिक्षकावर दबाव निर्माण करून फोन करून सांगितले की तुम्ही ग्रामसभा घेऊन घ्या बाकी आम्ही बघून घेतो असे निर्देश दिले त्यावेळी शिक्षकांनी ग्रामसभा घेतो पण मला काही माहिती नाही असे सांगून नुसते ग्रामपंचायत ला येऊन ग्रामसभा तहकूब झाली असे सांगून या बाकी आम्ही बघून घेतो आणि त्या शिक्षकांनी पण तेच केले ग्रामसभा तहकूब करण्यात आली आणि ते मागच्या पावलीच निघून गेले सावळा ग्रामपंचयत सचिव व सरपंच याना मुळात ग्रामसभा घ्यायचीच नव्हती त्या मुळे हि खटाटोप केल्याचे दिसून आले शासनाच्या आदेशाला या ग्रामपंचायत ने केराची टोपली दाखवित पंचायत राज दिनाच्या विशेष ग्रामसभेचे हेतुपुरस्कर पणे ग्रामसभा न होऊ देन्याच प्रयत्न यशस्वी केला त्यामुळे संबंधित सचिवाला व सरपंच यांचेवर कारवाई करण्याची मागणी सदस्य, व ग्रामस्थानी केली आहे. तहकूब करण्यात आलेल्या ग्रामसभा पुन्हा घेणार का या कडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Copyright ©