यवतमाळ सामाजिक

जागतिक वसुंधरा दिन व आंतरराष्ट्रीय पुस्तक, स्वामित्व हक्क दिन संयुक्तरीत्या साजरा

सहसंपादक गोकुल खडसे

जागतिक वसुंधरा दिन व आंतरराष्ट्रीय पुस्तक, स्वामित्व हक्क दिन संयुक्तरीत्या साजरा

सजीवांना जीवंत राहण्यासाठी पृथ्वी व समाजशील सुसंस्कृत माणूस म्हणून जगण्यासाठी पुस्तक ह्या दोन्ही बाबी जीवनावश्यक आहेत असे विचार भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव येथे प्राचार्य डॉ. प्रतिभा काळमेघ यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक वसुंधरा दिन व आतंरराष्ट्रीय पुस्तक, स्वामित्वहक्क दिवस ह्या संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक कोटूरवार राज्यशास्त्र विभाग प्रमुख, ग्रंथपाल डॉ. संजय शेनमारे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रशेखर ठाकरे व विद्यार्थी प्रतिनिधी तथा भूगोल अभ्यास मंडळ अध्यक्ष कु. अंकिता बुल्ले इत्यादी मान्यवर होते. विद्यार्थी दशेत मुलांमध्ये, युवकांमध्ये वाचन म्हणजे मनोरंजन, आनंद हा भाव संस्कार म्हणून रुजविण्याची गरज, महत्त्व व त्याविषयीची सतत जागरूकता तसेच लेखक, प्रकाशक यांचे स्वामित्वहक्क संबंधीचे आंतरराष्ट्रीय संगठन युनेस्कोचे योगदान यावर ग्रंथपाल डॉ. संजय शेनमारे यांनी प्रकाश टाकला. प्रसंगी ग्रंथवाचन व स्वामित्व हक्क अधिकार/कायदा जनजागृती संबंधी लेख व चित्रफिती लिंक विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअँप ग्रुप वर उपलब्ध करून देण्यात आले.
ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक कोटुरवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन व त्यांच्या ह्रासामुळे भविष्यात उदभवणाऱ्या समस्या, दुष्परिणाम ह्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. व वाचाल तरच स्पर्धेत टीकाल हा यशस्वीतेसाठी मंत्र दिला. प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थी लिखित माहितीपर लेखांचा अंतर्भाव असलेले ‘जीओग्राफिकल न्यूज’ हया मासिक भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी तथा भूगोल अभ्यास मंडळ अध्यक्ष कु. अंकिता बुल्ले यांनी पृथ्वीतलावरील वाढते प्रदूषण व तापमान या विषयी चिंता व्यक्त केली. तसेच ग्रंथालयातील उपलब्ध वाचन साहित्याचा महत्तम वापर करण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थी मित्रांना केले. कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चंद्रशेखर ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कू. रसिका नागपुरे, निशा येलके, प्रांजली दोडके, करिना जाधव, रविना जाधव, धनश्री परडखे, काजल भगत, रुपाली कडनाके, आचल दुधनकर, भूमिका शेंडे, भाग्यश्री खोब्रागडे, सीमा दिगुरे, ऋतुजा झोड, आचल शिंदे, तेजस्विनी खेकडे, साक्षी मेहरकर, तेजल डहाके, श्यामली धोंडगे, सर्वश्री विशाल हावणे, आदित्य कबाडे, आकाश जाधव, श्याम ठवकर, कुणाल मेंढे, करण जाधव यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Copyright ©