Breaking News यवतमाळ

दत्तरामपुर येथे ट्रॅक्टर व ट्रक चा झाला भीषण अपघात.

आर्णी प्रतिनिधी गणेश धनोडे

दत्तरामपुर येथे ट्रॅक्टर व ट्रक चा झाला भीषण अपघात.

भाब (राजा )येथील युवक जागीच ठार .

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी शहरातील दत्तरामपूर येथे ट्रॅक्टर व ट्रक चा भिषन अपघात झाल्याची घटना आज दिनांक 25 एप्रिल ला सकाळी 10 च्या दरम्यान घडली आहे
सदर अपघातात गणेश पंधरे रा. भांबराजा याचा जागीच मृत्यु झाला आहे
सदर व्यक्ती हा भांब येथिल मानकर विट कारखान्यावर लेबर म्हणुन काम करीत होता ट्रॅक्टर मध्ये विट भरून तो आर्णी मार्गे उमरी ला जात असताना ट्रक क्रमांक यु पी 94 टी 6792 हा ट्रक मागून भरधाव वेगाणे आला ट्रॅक्टर ला मागून धडक दिली त्यामध्ये ट्रॅक्टर वर बसलेला लेबर खाली पडला व तो ट्रक च्या चाकाखाली आला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला आहे.

Copyright ©