यवतमाळ सामाजिक

दिग्रस पालिके मध्ये विविध विभागात कंत्राटी कामगार पुरवून कंत्राटी कामगारांचा पैसा खाऊन पोट भरणारे 

संपादक सदानंद जाधव

दिग्रस पालिके मध्ये विविध विभागात कंत्राटी कामगार पुरवून कंत्राटी कामगारांचा पैसा खाऊन पोट भरणारे  अधिकारी व नगरसेवक कोन

नगर सेवक व अधिकाऱ्यांनी मिळून साधला डाव,बारामतीच्या गणेश इंडस्ट्रीज चे होते फक्त नाव

दिग्रस नगर परिषद मध्ये विविध विभागात एका संस्थेमार्फत अनेक तरुणांना  रोजगाराचे आमिष देऊन कामाला लावून घेतले व त्यांच्याकडून काम करून घेऊन नगर परिषद कडून लाखो रुपयांचे बिले काडून घेऊन त्या मजुरांना एक रुपया न देता वाऱ्यावर सोडून दिले.नगर परिषद मध्ये विविध विभागात मजूर पुरविण्याचा ठेका शिवसेनेच्या नगर सेवकाने आपल्या नातलगाचे नाव पुढे करून मिळविला व दोन अधिकाऱ्यांशी संगमत करून लाखो रुपयांची कमाई केल्याचे न.प .शी  निगडित असलेल्या लोकांकडून बोलल्या जात आहे.शिवसेच्या  नगर सेवकाने एका निष्ठावान शिवसेनिकाला नगर परिषद मध्ये आवास योजनेत कंत्राटीवर असताना तेथून त्याला काढून गणेश इंडस्ट्रीज मार्फत कंत्राटी मजूर म्हणून बांधकाम विभागात घेऊन 48000 हजार रुपयानि लुबाडले असल्याची व्हिडीओ चित्रफीत त्या निष्ठावान  शिवसेनिकाने आपल्या मित्रा कडे दिली आहे त्या चिटफित मध्ये शिवसेनेच्या नगरसेवका सह त्या दोन अधिकाऱ्यांची नावे लवकरच उघड होतील ,

Copyright ©