यवतमाळ सामाजिक

पैसे खाऊन झाले तीन वर्ष ,तरी सोच्छालय नाही पूर्ण

पैसे खाऊन झाले तीन वर्ष ,तरी सोच्छालय नाही पूर्ण

हिवरी येथील ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची व्यापली असून प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने एक एक प्रकरण समोर येत आहे येथील ग्रामसेवक बी एन ठाकरे यांच्या कार्यप्रणाली मध्ये झालेल्या गैर प्रकाराच्या चौकशीसाठी तक्रारीही दाखल करण्यात आली असून नवीन प्रकरण समोर आले आहे ते म्हणजे २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आलेल्या राधा कृष्ण मंदिरात संडास,बाथरूम बांधण्यास सुरुवात केली तीन वर्ष होऊन हि येथील बांधकाम अपुरेच आहे,या बाबत अनेक वेळा विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ग्रामसेवक यांचे कडून मिळत नसल्याने ग्रामवाशी त्रस्त झाले आहे या बांधकामाचे १,८०,००० रुपये खाऊन फस्त झाले मात्र बांधकाम तसेच राहिले अशा प्रकारचे अनेक प्रकरण असल्याचे दिसून येत आहे आता या तरी प्रकरणाची गटविकास अधिकारी चौकशी करेल का ? की पुन्हा भ्रष्टचाराला खत पाणी घालणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

Copyright ©