यवतमाळ सामाजिक

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त झाडांना बांधले पक्षीपात्र

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त झाडांना बांधले पक्षीपात्र

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्थानिक दर्डा उद्यान व प्रेरणा स्थळ ह्या ठिकाणी संकल्प फाउंडेशन व एक हात मदतीचा,वन्य जीवासाठी च्या वतीने झाडांना पक्षीपात्र बांधण्यात आले,विशेष बाब म्हणजे स्थलांतर झालेले अनेक पक्षी ह्या ठिकाणी वास्तव्यास असतात रोज किमान चार ते पाच लाख पोपट रात्रभर वास्तव्यास असतात,मिळालेल्या माहितीनुसार पोपट व इतर पक्षाना ह्या ठिकाणी मुक्त संचार करता यावा म्हणून संध्याकाळी 6 चे नंतर फक्त हे उद्यान पक्षासाठीच खुले व,मानवी संचारबंदी असते,त्यामुळे एव्हढया मोठ्या संख्येने हे पक्षी येथे विहार करतात,त्यांच्या सोईच्या दृष्टीने आज अनेक झाडांवर मातीचे पक्षीपात्र बसविण्यात आले,हे पक्षीपात्र टाकाऊ मडक्यापासून तयार केले असल्यामुळे उन्हात सुद्धा त्यातील पाणी थंडगार राहते,पर्यायाने कोणत्याही वेळेला पक्षांना थंड पाणी प्यायला मिळेल अशी माहिती पक्षी मित्र दिनेश तिवाडे ह्यांनी दिली,ह्या उपक्रमाची माहिती संकल्प फाउंडेशन च्या वतीने श्री किशोर बाबू दर्डा ह्यांना दिली।असता,त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित कर्मचाऱ्याला सोबत दिले व हा अत्यंत उल्लेखनीय उपक्रम पार पडला ह्यावेळी संकल्प फाऊंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके,सहसचिव रवी माहुरकर,संकल्प कृषिमित्र अमोल चौधरी,संकल्प आरोग्य मित्र प्रशांत बोराडे,बालाजी गरूडकर,दिनेश तिवाडे,तुषार सुलभेवार उपस्थित होते

Copyright ©