यवतमाळ सामाजिक

संपादक कोटबंकर हल्ला प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करा

संपादक कोटबंकर हल्ला प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करा

ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव ची मागणी

ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

संपादक रवींद्र कोटबंकर यांचेवर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा, ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.व हल्लेखोरांवर कडक कारवाई करा.या प्रमुख मागणीसाठी ठाणेदार मारेगाव मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

वर्धा येथील जेष्ठ पत्रकार, संपादक रवींद्र कोटबंकर यांचेवर काही समाजकंटकांनी प्राण घातक हल्ला करुन त्यांना जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना अतिशय निंदनीय असुन लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावर हा घाला असुन लोकशाहीची मुस्कटदाबी आहे.या घटनेतील आरोपीवर कारवाई होणे अपेक्षित आहे.अश्या कृत्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.या घटनेचा मारेगाव येथे जाहीर निषेध करण्यात आला. व घटनेतील आरोपीवर कडक कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पोल्हे,ज्योतिबा पोटे,सुरेश नाखले,नागेश रायपुरे, उमर शरीफ,अशोक कोरडे,माणिक कांबळे,भास्कर धानफुलें, श्रीधर सिडाम,रमेश झिंगरे,दिलदार शेख,मोरेश्वर ठाकरे,सुमित हेपट,आनंद नक्षणे, भाष्कर राऊत,सचिन मेश्राम,पंकज नेहारे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Copyright ©