यवतमाळ सामाजिक

उमरी (का) येथील आदिवासी पोडाकरीता सार्वजनिक विहिरीच्या कामाचे भूमिपूजन

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

उमरी (का) येथील आदिवासी पोडाकरीता सार्वजनिक विहिरीच्या कामाचे भूमिपूजन

आर्णी तालुक्यातील उमरी (कोपेश्वर) येथील वार्ड नं. 2 या आदिवासी वस्ती मधील पोडावर अनेक वर्षापासून पाण्याची भीषण टंचाई होती. पिण्याच्या पाण्याची अद्यापपर्यत एकही कायमस्वरूपी योजना तेथे पोचलेली नव्हती. पाण्यावाचून तेथील लोकांची भटकंती होत होती. आदिवासी व्यक्ती, वस्ती व जनावरे पाण्यावाचून तहानलेली होती. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे पाण्याची वाट त्यांना बघावी लागत होती.
आदिवासी महिलांचा आर्णी पंचायत समितीवर दोन वेळा मोर्चा निघाला. ऐकवेळा तर या मोर्चाचे नेतृत्व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी केले ,
ऊमरी येथील पिन्याच्या पान्याची टंचाई संदर्भात प्रशासनाच्या बाब निदर्शनास आणून दिली. तरीही उपाययोजना होत नसल्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी आमरण उपोषण पुकारले होते. कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन‌ मिशनचे अध्यक्ष मा‌. किशोर भाऊ तिवारी यांनी उमरी येथे स्वता भेट देऊन प्रशासनासोबत चर्चा करून सदर बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आर्णी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे मॅडम यांनी या आदिवासी वस्ती करिता तातडीने विहीर मंजूर केली. या विहिरीचे भूमिपूजन गावातील प्रतिष्ठित नागरिक व ऊपस्थित कर्मचाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा करून कुदळ मारून करण्यात आले.
या ठिकाणी उमरी ग्रामपंचायत चे प्रशासक तथा विस्तार अधिकारी (पंचायत) जी.आर. इंगोले , विस्तार अधिकारी गजानन चोपडे , शाखा अभियंता प्रमोद बनसोड , ‘ग्रामपंचायत सचिव कैलास आडे , उमरी गावातील सुभद्रा धुर्वे , वंदना नरवाडे , वनमाला धुर्वे , जनाबाई पेंदोर , नंदिनी कुमरे , विमल कुमरे , शकुंतला खडसे , वंदना आरके , कमला मेश्राम , प्रमिला गेडाम , लक्ष्मण धुर्वे , सुभाष नरवाडे सुनील कोरवते , अर्जुन आत्राम , तुळशीराम धुर्वे , अविनाश तोडसाम , मारुती गेडाम , निकेश मडावी , शालिक आरके , राजू मेश्राम यांच्यासह गावातील अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.
याचवेळी पिन्याच्या पाण्याच्या टाकी साठी गावात प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटत असल्यामुळे गावकऱ्यांनी कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष मा‌. किशोरभाऊ तिवारी , आर्णी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे मॅडम व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा‌. मुबारक भाऊ तंवर यांचे मनापासून आभार मानले.

Copyright ©