यवतमाळ सामाजिक

विनोद दोंदल यांचा भीम महोत्सवात सन्मान

विनोद दोंदल यांचा भीम महोत्सवात सन्मान

यवतमाळ- येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांचा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित भोम महोत्सव २०२२ सन्मान कर्तव्याचा सोहळ्यात प्रशस्ति पत्र व भारताचे संविधान देऊन करण्यात आला सन्मान,
कोरोना महामारीचा काळात कोरोनाने आपल्या देशात भयंकर संकट ओढवले होते, त्या संकटावर मत करण्या साठी विनोद दोंदल यांनी आपलेही काही कर्तव्य आहे असे समजून आशा बिकट कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसामान्य नागरिकांना, अत्यंत गरजू व गोरगरिबांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी व गरिबांना अन्नधानाची व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र कार्य केले आणि मुक्या प्राण्यांची काळजी घेत इत्यादी अनेक कार्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाज हितासाठी निस्वार्थपणे पार पाडून आपले कर्तव्य बजावले आशा जनसेवकास हया वेळी सन्मानित करण्यात आले, हया प्रसंगी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरीताई मडावी, तहसीलदार कुणाल झालटे, सामाजिक कार्यकर्ता भाई अमन, कार्यक्रमाचे आयोजन सुकांत वंजारी व विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते,

Copyright ©