बेला प्रतिनिधी कैलास साठवणे
आरोग्य विभाचा भोंगळ कारभार,चव्हाट्यावर प्रशासनाने जनतेच्या जीवाशी केला खेळ सुरू
बेला प्रा. आरोग्य केंद्राअंर्तगत सहा उपकेंद्र असून नागपूर तालुका व वर्धा जिल्हयातील समुद्रपूर तालुक्यातील गावांचे रुग्णांना देतात अपुरी आरोग्य सेवा, बेला प्रा. आ. केंद्रातील 13 पैकी 7 पदे रिक्त तर 6 उप केंद्रातील 4 पदे रिक्त. अपूर्ण कर्मचारी सख्येंत आरोग्य विभागाने रुग्णाच्या चक्क जीवाशी खेळ सुरू केला आहे.
विस हजार लोकसंखेचे बेला गाव, मानस एग्रो साखर कारखाना, आय डि एल विद्युत प्रकल्प व 42 गावा पेक्षा जास्त गावाला तर 40 हजार पेक्षा जास्त लोकसंख्ये ला बेला प्रा. आ.केंद्र सेवा देत आहे ती केवळ सहा कर्मच्याऱ्यानवर, यात काही गैर हजर तर काही सुट्टीवर गेल्या नंतर हे केंद्र कुणी चालवायचे असा यक्ष प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे
विशेष म्हणजे *बेल प्रा.आ. केंद्रातील कर्मचात्यांची रिक्त पदे* : 1 वाहन चालक, 1 सफाई कामगार, 3 परिचारक 2 ANM 13 पैकी 7 पदे रिक्त तर उपकेंद्र खुर्सापार चे 1 परिचारक सावंगी (खु) 1 ANM शंडेश्वर1 mpw आष्टाचे1mp3 इतकेच नाही तर
बेला प्रा. आ. केंद्राल 2. MBBS डॉ. ची पदे असुन कायम स्वरूपी असताना एकही डॉ. नाही आणि दोन्ही प्रतीनियूती वर आहे. *विशेष सांगायचे म्हणजे* बेला प्रा आ. केंद्रा चे डॉ. माने व डॉ. ड्डमल हे सिर्सि प्रा. आ. केंद्रात प्रती नियुक्तितीवर काम करत आहे. तर सिर्सि प्रा.आ. केंदाचे डॉ. पंधरे हे मकरधोकड्याला व मकरघोकड्याच्या डॉ. सोनाली वानखेड़े. बेला प्रा.आ. केंद्रात प्रती नियुक्तितीवर काम करत आहे. बेला-सिर्सी हे २३KM सिर्सि- मकरधोकडा 35 तर मकरधोकडा ते बेला 40 कि.मि. अंतर आहे.प्रवास करीत खरचं सर्व सामान्यांना सेवा मिळत असेल का हे सांगण्यास तज्ञ ची गरज नाही
या बाबत
जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे , याकरून शासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे या बाबत . मुख्यालयातील असलेल्या लोकांच्या तक्रारी आहे, तर प्रतीनियुक्ति च्या ठिकानी तक्रारी नसेल का ? असाही प्रश्न उद्भवत आहे विशेष म्हणजे २२ कि.मि. 35 कि.मि. व 40 कि.मी. अंतरावर फेरी मारत व परिवारापासुन दूर राहुन कुठल्या मानसीकतेत संबंधित डॉ. रुग्ण सेवा देत असेल असा विचार न केलेलाच बरा. उमरेड पं.स.च्या मासिक सभेत यावर सविस्तर चर्चा करून नियुक्ति च्या ठिकानीच डॉ. ना पाठवण्याचा ठराव घेतल्याचे समजते, यावर प्रशासन काय कारवाई करणार की जनतेला वाऱ्यावर सोडणार या कडे तालुका वाशियांचे लक्ष लागले आहे.
Add Comment