सहसंपादक गोकुल खडसे
शिरिष सरताबे निघाले नर्मदा स्वच्छ करून , किनारी झाड लावण्याच्या प्रवासाला.
नेहमीच राष्ट्रहिताची, स्वच्छतेची कार्य करणारे शहरातील सामजिक कार्यकर्ते उदय शिरिष सरताबे यांचे वडील, जेष्ठ नागरीक शिरीष विष्णुपंत सरताबे यांनी याआधी २०१८ साली ११ महिन्यांची परिक्रमा मोहीम केली होती. आता पुन्हा एकदा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सरताबे हे साडेतीन वर्षाची परिक्रमा करणार असल्याचे म्हणाले. यापूर्वीच्या अनेक मोहिमा त्यांनी पायी चालत मार्गस्थ केल्या. आता साडेतीन वर्षांची ही परिक्रमा ते सायकलने पार करणार आहेत.
रोज नदीबरोबर शांततेच्या प्रवाहात सामील व्हायचं, अंघोळ करायची, दगड धोंडे पार करत रानावनात वास्तव्य करायचं असा दिनक्रम गेल्या ११ महिन्यांच्या परिक्रमातील माझा असायचा आणि तेव्हा घरी जाण्याची इच्छाच देखील नसायची अस त्यांनी यावेळी सांगितलं.
आमचे बाबा किमान वर्षभर तरी घरी राहिले असतील असं कधीही झालं नाही. ते सतत निसर्गसोबत राष्ट्रकार्य करण्यासाठी बाहेरच असायचे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान देखील आहे असं कुटुंबीय सांगतात.
Add Comment