यवतमाळ सामाजिक

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माथेफिरूस ग्रामीण पोलिसांनी केली अटक

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माथेफिरूस ग्रामीण पोलिसांनी केली अटक

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळगाव येथील आरोपी संकेत भीमराव लोहकरे वय पंचवीस वर्ष याला पोलिसांनी नुकतीच अटक केली 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर वरील फोटोला चिरे मारून फाडले असता या घटनेची तक्रार अतुल बनसोड यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली होती यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये साक्षीदार यांचे जवाब व तांत्रिक पुराव्यावरून आरोपी संकेत भीमराव लोकरे वय पंचवीस वर्ष राहणार करळगाव येथील आरोपीस अटक करण्यात आली याप्रकरणी न्यायालयात मधून आरोपीस २४ फेब्रुवारी पर्यंत पी. सी.आर.देण्यात आला असून या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ ऊताने, अमोल ढोकणे जमादार कैलास लोथे संदीप मेहेत्रे, नितीन कोवे, सचिन पातकमवार यांनी या घटनेचा छडा लावला असून या प्रकरणी तपास सुरू केला आहे

Copyright ©