यवतमाळ सामाजिक

यवतमाळ मनदेव रस्त्या लगत लागलेल्या आगीला आणले आटोक्यात वनसंपदेचे हानी टळली.

यवतमाळ मनदेव रस्त्या लगत लागलेल्या आगीला आणले आटोक्यात वनसंपदेचे हानी टळली.

मनदेव परिसरातून यवतमाळ कडे जात असणाऱ्या मनपूर गावातील एका जागरूक नागरिकाने रस्त्या कडेला वणवा लागून दिसल्याने त्यांनी सम्बधित वनरक्षक , आणि MH 29 हेलपिंग हँड टीमचे पर्यावरण प्रेमी जीवन तडसें यांना कॉल करून माहिती दिली की मनदेव परिसरात हायवे लगत आग लागलेली आहे.
उन्हाळ्यात लागणाऱ्या वनव्याचे गांभीर्य लक्षात घेता. क्षणाचाही विलंब न करता MH 29 हेलपिंग हँड टीम, आणि वनविभाग घटनास्थळी पोहचून. एका फायर ब्लॉवर मशीनच्या साहाय्याने काही मिनिटातच आग आटोक्यात आणली.
आग आटोक्यात आणल्याने वनसंपदेची हानीआणि आग जंगलात पसरण्याचे टळले.
यावेळी हिवरी वनपरिक्षेत्र वनपाल सुनिल लोहकरे आणि अर्जुना बिट वनरक्षक विवेक पांडे वनमजुर गणेश व MH29 हेलपिंग हँड टीम चे जीवन तडसें, सूरज खडके,आणि दीपक मिरासे उपस्थित होते.

टीमचे पर्यावरनाबद्दल तळमळ लक्षात घेता वनविभागाने टीमच्या सहकार्याबद्दल टीम चे आभार मानले .आगविझवण्यात वनविभाग व हेलपिंग हँडस टीम ने सयुक्तविधमानांने सोबत काम करून आग विझवली.

Copyright ©