Breaking News महाराष्ट्र सामाजिक

वर्धा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध,हल्लेखोरांना त्वरित अटक करा :- ग्रामीण पत्रकार संघाची मागणी

वर्धा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध,हल्लेखोरांना त्वरित अटक करा :- ग्रामीण पत्रकार संघाची मागणी

वर्धा येथील दैनिक साहसिक चे संपादक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा स्व. पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्री याना जिल्हा निवासी जिल्हा अधिकारी यांचे मार्फत केली आहे.
वर्धा येथील दैनिक साहसिक चे संपादक रविन्द्रजी कोटंबकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला एका निर्भिड पत्रकारावर हल्ला म्हणजे चौथ्या स्तंभावर हल्ला करण्यात आला हि बाब अत्यंत निंदनीय असुन हल्ले खोराणा पत्रकार सवरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा संपर्ण राज्यात आंदोलने करण्यात येईल.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
या प्रकरणी दिनांक २० एप्रिल दुपारी १ वाजता जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,पवन धोत्रे,संतोष डोमाळे, दत्तु कुशावार,सचिन चौधरी,निलेश पवार,राजेश भागानगरकर,इत्यादि या वेळी उपस्थित होते.

Copyright ©