यवतमाळ सामाजिक

भाजप महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने योगं नृत्य

सहसंपादक गोकुल खडसे

भाजप महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने योगं नृत्य

भाजप महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने योगं नृत्य. हल्ली धावपळीच्या काळात स्वतःसाठी वेळ काढणे फार मुश्कील असते त्यात महिलावर्ग घरातील कर्तव्य आणि जबाबदारी मुळे स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. घराचा आधारस्तंभ म्हणजे त्या घरातील स्त्री तिने तिचे आरोग्य जपावे म्हणून महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने योगा नृत्य सेंटर जे एन पार्क लोहारा यवतमाळ येथे सुरू झाले आहे. अतिशय आनंदाने आणि उत्साहात येथील महिला या उपक्रमात सहभागी झालेले आहे. उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून कमल बागडी राजेश नागुलवार, गणेश गुप्ता आणि त्यांचे संपूर्ण टीम काम करीत आहे त्याच प्रमाणे जैन पार्कमध्ये संपूर्ण ग्राउंडची व्यवस्था सारिका मेश्राम, दिपाली भोयर,, रजनी गजबे,शीला मोना पुरे या करतात. त्याच प्रमाणे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षक म्हणून जबाबदारी राखी जाधव मीनाक्षी झेंडेकर अर्चना राठोड सारिका गलचलवार भाग्यश्री आडे सरिता बाजल वार पार पाडीत आहे महिलांचा अतिशय उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद पाहून आयोजक शैला मिर्झापुरे भाजप जिल्हा सचिव यांनी विविध ठिकाणे हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केलेला आहे.

महिला सक्षमीकरण केंद्र महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना उद्योगासाठी प्रेरित करण्यासाठी तसेच त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी कार्य करीत असतानाच जाणीव झाली की महिला आपल्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करतात त्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या आरोग्यालाही जपणे तेवढेच गरजेचे आहे म्हणून महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने महीलांसाठी योगा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला महिलांचा उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद पाहून आणखी महिलांसाठी यासारखे उपक्रमाचे नियोजन आहे. —-==== शैला मिर्झापुरे भाजपा जिल्हा सचिव

Copyright ©