यवतमाळ सामाजिक

आरोग्य मेळाव्यात तज्ञांद्वारे तपासणीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गरीब रूग्णांना पाच लाख पर्यंत उपचाराची सुविधा

 

आरोग्य मेळाव्यात तज्ञांद्वारे तपासणीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

 

पुसद तालुका आरोग्य मेळाव्यात 1257 रुग्णांनी घेतला लाभ

यवतमाळ दि. 18 एप्रिल, :- जिल्ह्यात 18 ते 22 एप्रिल या कालावधीत प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून येथे तज्ञाद्वारे मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. निदान करण्यात आलेल्या रुग्णांना मेळाव्यानंतरही आवश्यक औषधोपचाराची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच आरोग्य मेळाव्यात आयुष्यमान भारत योजना अंतर्गत हेल्थ कार्ड बनविण्यासाठी विशेष शिबीर आयोजित केले असून हेल्थ कार्ड धारकांना नामांकित खाजगी रुग्णालयात देखील पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहे. तरी नागरिकांनी आपली वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राज्याच्या आरोग्य विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्य आयुष्यमान भारत अंतर्गत 18 ते 22 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्य मेळावा आयोजित करणात आला आहे. त्याअंतर्गत आज पुसद येथील आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी आमदार इंद्रांनिल नाईक, आमदार निलय नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस. चव्हाण, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आरोग्य मेळावा आयोजनाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी.राठोड यांनी प्रास्ताविकेतून माहिती दिली. यावेळी आमदार इंद्रांनिल नाईक व आमदार निलय नाईक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून नागरिकांना आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात आरोग्य मेळाव्याचे आयोजन 19 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव व दारव्हा येथे, 20 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय मारेगाव, वणी, महागाव, कळंब व झरी, 21 एप्रिल रोजी नेर, यवतमाळ व 22 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय पांढरकवडा, आर्णी, उमरखेड, राळेगाव,दिग्रस, घाटंजी येथे आयोजित करण्यात आले आहे.

आज पुसद येथील आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्यात 1091 रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली तर 166 रुग्णांना टेलेकन्सल्टेशनद्वारे आरोग्य सल्ला देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दिली आहे.

आरोग्य मेळाव्याला पुसद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सुकलवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिनल भेलोंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयकुमार नाईक, बाल विकास प्रकल्प अधिकारी सखाराम माने, उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ. बिरबल पवार, कैलास राठोड, डॉ. पूनम चव्हाण, डॉ. अतुल रुणवाल, डॉ. रोहिणी लोणकर, डॉ. मनिष देशमुख, डॉ. सुनीता वानोळे, डॉ. आशिष कदम, डॉ. अशिष देशमुख डॉ. विजय सारडा, अमोल जाधव, तालुक्यातील तज्ञ खाजगी डॉक्टर विरेंद्र पापळकर, डॉ. सतीश चिद्दलवार, डॉ. सुप्रिया चिद्दरवार, डॉ.मंजुषा तगल्पल्लेवर, डॉ. राजेश चव्हाण, डॉ. लता अग्रवाल, डॉ. अक्षय शिंदे, डॉ. प्रणाली इंगोले, डॉ. आकुमवार, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या राठोड, डॉ. रती वावदाने, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल चव्हाण, शरद ताटेवर, डॉ. दीपक पोले, डॉ. दिनेश चव्हाण डॉ.गणेश काळे, डॉ. साक्षी तांबेकर, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक स्त्री-पुरुष,आरोग्य कर्मचारी स्त्री-पुरुष, कनिष्ठ सहाय्यक,आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, इत्यादी उपस्थित होते.

____________________________________________

 

शेतमाल ट्रेडींगबाबत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटासाठी

21 एप्रिल रोजी प्रशिक्षण कार्यक्रम

 

यवतमाळ दि. 18 एप्रिल, :- एन.सी.डी.इ.एक्स. , प्रकल्प संचालक आत्मा व कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने एन.सी.डी.एक्सच्या प्लॅटफॉर्मवर शेतमाल ट्रेडींगची शेतकरी उत्पादन कंपन्यांना संधी या विषयावर दिनांक २१ एप्रील २०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, वाघापुर रोड, यवतमाळ येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या प्रशिक्षणामध्ये रोहन धांडे, डेप्युटी मॅनेजर,एफ.पी. ओ. टीम, इती बेदी, सीनीयर एक्सुकेटीव्ह एफ.पी.ओ.टीम मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा चे प्रकल्प संचालक नवनाथ कोळपकर यांनी केलेले आहे.

____________________________________________

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेशपत्र डाऊनलोड प्रक्रिया सुरू

यवतमाळ दि. 18 एप्रिल, :- जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील शैक्षणिक सत्र 2022-23 मधील इयता सहावी करिता निवड चाचणी 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता पासून दुपारी 01.30 या नियोजित वेळेत होणार आहे.

या परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करणे सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी www.navodaya.gov.in या संकेत स्थळावरून प्रवेश पत्र डाउनलोड करून त्या प्रवेश पत्रावर ज्या शाळेत सध्या वर्ग 5 वी मध्ये शिकत आहे, तेथील मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेवून प्रवेश पत्राच्या दोन प्रती सोबत परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहावे, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.डी. धोपटे यांनी कळविले आहे

Copyright ©