यवतमाळ सामाजिक

वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे धाव, प्राण्या समवेत सर्वसामन्यांचे जीवन धोक्यात !

वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे धाव,
प्राण्या समवेत सर्वसामन्यांचे जीवन धोक्यात !

वनविभागाच्या निस्क्रियतेने वण्यप्राणी भटक्ती करीत असल्याने अनेकांचे प्राण संकटात येत आहे त्यांना पाणी मिळत नसल्याने चक्क गावाकडे धाव घेत आहे आणि त्याचे परिणाम अनेकांच्या जिवारी येत आहे उदाहरण द्यायचे झाल्यास
घाटंजी तालुक्यतिल आमडी या गांवी काही दिवसापुर्वी राणडुकराने गावालगतच दोन व्यक्तिंना गंभीर घायल करून गावात जावुन दोन कुत्रांना गंभिर जख्मी केलेतर पिंप्री येथेही गावालगतच गायिला वाघाने ठार केले तर अगदी परवालाच पारवा वनपरीक्षेत्र अंतर्गत मांजरी येथील तरूणावर राणडूकराने हल्ला करुन गंभीर जख्मी केले तर दहाविचा शेवटचा पेपर देवुन परत गावाकडे येणार माणुसधरी येथील विद्यार्थ्याचा वाघाने गावापर्यंत पाठलाग केला ह्या सर्व घटना अगदी गावाजवळ घडल्याने हे सिध्द होतेय की वन्य प्राण्याना जंगलात पाणि मिळत नसल्याने हे श्वापद पाण्यासाठी गावाचा आडोसा घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे गावतील जनतेने शेतात जावुन शेतकामे कसे हां प्रश्न निर्मान झाला आहे त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देवुन वन्य प्राण्यांची तहान भागविन्याची व्यवस्था करावी परंतु ही त्वरीत होवु शकणार नसल्याने वाघाडी नदीला पाणि सोडुन ह्यांची तहान भागवावी व ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा कारण पाण्यासाठी वन्य प्राण्यांची धाव गावागावात सुरू झाल्याने चीतेची बाब झाली आहे
जंगलात पानवठ्यांची व्यवस्था करणे आवश्यक असताना हि या कडे दुर्लक्ष करण्यात आले.सध्याची खबरदारी म्हणून
वाघाडी नदिला पाणि सोडण्याची नितांत गरज आहे त्या मुळे वण्य प्राणी व पाळीव प्राण्याचे प्राण वाचविण्यााठी मदत होईल अशी मागणी
घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग निवल यांनी केली आहे
तालुक्यातील सर्व नदी नाले व जंगलातील पाणवठेही कोरडे पडल्याने वन्य प्राणी आपली तहान भागवीन्यासाठी गावागावात शिरकाव करीत असल्याचे दिसते त्यामुळे गावातिल जनतेच्या जिवित हानीस धोका पोहचत आहे मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग निवल यांनी केली आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©