यवतमाळ सामाजिक

आशा व गटप्रवर्तक यांचे वाढीव मानधन व थकीत मानधन अदा करा आयटकचे शीओ व डीएचओ यांना निवेदन

आशा व गटप्रवर्तक यांचे वाढीव मानधन व थकीत मानधन अदा करा आयटकचे शीओ व डीएचओ यांना निवेदन

यवतमाळ:- आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची सभा नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांनी आपल्या व्यथा मांडल्या त्यांना मानधन व प्रोत्साहन भत्ते वेळेवर भेटत नसल्यामुळे सतत उपासमार सोसावी लागत आहे पाच – पाच , सहा – सहा महिने मानधन व प्रोस्ताहन भत्ते मीळत नाही त्यामुळे सतत मरणयातना सहन कराव्या लागत आहे. मानधनाची व प्रोत्साहन भत्याची वाट बघत ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवची कामे करावी लागतात असे मत त्यांनी व्यक्त केले ; ही परिस्थिती सर्वच पीएचसीतील असुन या बाबत वारंवार आंदोलने करावी लागत आहे. तरीही प्रशासनाने मानधनाचा प्रश्न निकाली काढला नाही.
आपले म्हणणे आहे संघटना प्रशासनाला मदत करीत नाही आम्ही प्रशासनाला नेहमीच मदत करीत आलो आणि करीती आहोत.
थकीत मानधना बाबत मागणी करूनही प्रशासनाने संघटनेला लेखी कधीच कळविले नाही, मग संघटने समोर आंदोलना शीवाय कोणताच पर्याय उरत नाही, आंदोलना अगोदर प्रशासनाने संघटनेला चार दिवस आधी लेखी कळवावे अन्यथा दिलेल्या तारखेला आंदोलन होणार आहे हे लेखी कळवून सुध्दा. प्रशासनाची भूमिका संदिग्ध असते. अनेक वेळा चर्चे वेळीही आपले म्हणणे लेखी द्यावे असे संघटनेने म्हटले आहे परंतु आपण लेखी देण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे. मग संघटने समोर पर्याय काय आहे ? आम्ही काय करायला पाहिजे असे प्रशासनाला वाटते ? ह्या बद्दलही मार्गदर्शन करावे …
यापूर्वी दि.१४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आपल्या कडून मागण्या निकाली काढाण्यात याव्या किंवा त्या बाबत संघटनेला लेखी कळवावे म्हणून संघटनेने आग्रह धरला त्या वेळीही आपण लेखी दिले नाही.
शेवटी आम्ही संप पुकारला आणि ४ – ५ दिवस संप सुरू राहीला तरीही प्रशासनाने संघटनेला लेखी दिले नाही. शेवटी संघटनेने संप मागे घेतला ; परंतु संप काळात पुसद व आर्णी तालुक्यातील गटप्रवर्तक यांचे ३-४ दिवसाचे मानधन कपात करण्यात आले हे अन्याय कारक आहे. ज्या गटप्रवर्तकांचे मानधन कपात करण्यात आले ते त्यांना परत करण्यात यावे,
जर प्रशासनाने संघटनेला लेखी कळविले असते तर संप करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता,
तरी गटप्रवर्तक यांचे संप काळातील कपात केले मानधन परत करण्यात यावे अशी आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करीत आहेत.
आमच्या मागण्याचा सारासार विचार करावा व शासन परिपत्रका नुसार आशा व गटप्रवर्तक शोषीत – पीडीत महीलांचे वाढीव मानधन तसेच सर्व प्रकारचे मागील थकबाकी सह थकीत मानधन व प्रोस्ताहन भत्ते अदा करण्याची कारवाई करावी अशी मागणी करतो …
तरी आपण आमच्या वरील मागण्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करून मागण्या निकाली काढाव्यात असे निवेदन देण्यात आले अशी माहिती प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे
कॉ.दिवाकर नागपुरे
जिल्हा सचिव, आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यांनी कळविले आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©