यवतमाळ सामाजिक

पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत फीरते पोलीस ठाणे उपक्रम

सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान

पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत फीरते पोलीस ठाणे उपक्रम

सावळी सदोबा:-पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांच्या सुविधेसाठी पुढील सात दिवस फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे, पोलीस ठाण्याचे सर्वदूर पसरलेली विस्तीर्ण हद्द व त्यातील आदिवासी लोकसंख्या असलेली गाव पाहता, सांस्कृतिक व सामाजिक प्रथा परंपरा यामुळे पोलीस ठाणे पारवा येथे तक्रार देण्यास जाण्यापासून आदिवासी समाज मध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, क्लिप महिला मुली जेष्ठ नागरिक लहान मुले यांच्याकरिता पोलिस ठाणे येथील फिरते पोलीस स्टेशन करिता परवा ठाणेदार स्वतः सोबत इतर अधिकारी व पोलीस अमलदार हद्दीतील दूरवर असलेल्या खेडेगाव सावळी सदोबा सर्कल मधील एकूण 42 गावे आहेत प्रत्येक गावात जाऊन पुढील आठवडाभर फिरते पोलीस स्टेशन ही संकल्पना राबवणार आहेत,फिरते पोलीस ठाणे पथक.१अधिकारी व ३ पोलीस अंमलदार, स्टेशन डायरी व कागदपत्रासह,औकरन्स बुक,सरकारी वाहण, नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे लहान-मोठी तक्रारी दाखल करून घेणे, नागरिकांना तक्रार देण्यास वाटणारी भीती व गैरसमज दूर करणे, महिला,बालक,ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तीं सोबत संवाद साधून,सहकार्य करणे आणी त्यांच्या तक्रारी जाणून घेणे या प्रमुख उद्देश आसह फिरते पथक हा उपक्रम पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याकडून राबविण्यात येत आहे

Copyright ©