यवतमाळ सामाजिक

भागवत समारोहात वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडी ने गावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले

भागवत समारोहात वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडी ने गावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले

हिवरी येथील सातदिवसांचे भागवत कथेचे आयोजन केले यात भागवताचार्य शोभाताई गावंडे यांच्या अमृत मयवानी मधून सात दिवस ज्ञानार्जन करण्यात आले त्या निमित्त विविध धार्मिक भजन,कीर्तन भारुड इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अनेक संत प्रबोधनकार यांनी येथील प्रवचाणा द्वारे प्रबोधन करण्यात आले तर वृक्ष वल्ली हे आम्हा सगे सोयरे यावर प्रबोधन करून या बाबत प्रत्येकानी एक वृक्ष तरी लावावे जेणे करून हि आपल्या वारसांना संपत्ती होईल अन्यथा कुणालाही ऑक्जीजन मिळणार नाही,आपण हि परिस्थिती कोरोणा काळात अनुभवली कारण तर वृक्षाचा होत असलेला रह्यास म्हणून भविष्यासाठी वृक्षाची जोपासना करणे वृक्ष लावणे हेच आपले प्रथम कार्य आहे असे वृक्ष दिंडीचे उद्घाटक उपवन संरक्षक अधिकारी आनंद रेड्डी येलु हे होते तर वनाधिकारी प्रशांत बहादूरे यांची प्रमुख उपस्थिती होती
भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यात प्रामुख्याने
3 एप्रिल पासुन राधा श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ ह. भ. प. सौ शोभाताई गावंडे यांच्या अमृत मय वानिमधून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले 3 एप्रिल सकाळी ११ वाज.कलश पूजन व भागवत कथेस प्रारंभ केला,४ एप्रिल ह भ. प. पांडुरंगजी गावंडे सेलोडी ता.दारव्हा भजन,५ एप्रिल भांब (राजा )येथील पसारे महाराज यांचे भारुड, महिला भजनी मंडळ,गुरुदेव भजनी मंडळ हिवरी यांचे भजन ८ एप्रिल अक्कावार गुरुजी महाराज आर्णी यांचे कीर्तन,गजानन भजनी मंडळ हिवरी यांचे भजन तर गोपाल काल्याचे कीर्तन गजानन शेबे महाराज यांचे काल्याचे कीर्तन घेण्यात आले १० एप्रिल ला ग्रंथ पूजन दिंडी,वृक्ष दिंडी आणि गावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले संपूर्ण गावात सात दिवस सर्वत्र भक्तीमय वातावणात काकड आरतीचे हि आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपवनसंरक्षक अधिकारी तर संपूर्ण गावास प्रशांत बहादुरे यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास चित्रपट निर्माते तथा अभिनेते अनिल धकाते, माजी उपसरपंच बबनराव चेके यांनीही विशेष सहकार्य केले वनविभाचे आनंद रेड्डी येलू , सुनील लोहकरे,निलेश मोटे,शशिकांत आकरे, के.सी.जाधव वनपाल ,तर एन. व्ही.तांभारे, वी.सी. कैतवास, अक्षय डुकरे व. र.लक्ष्मण भिसे,विवेक पांडे, व्हि व्हि बांगर, एस.बी.लोहकरे, प्रांजली दांडगे,  ए व्हि वाघमारे,निता वी.पोहरे,सितल रापुरकर,वैशाली चीलंनकर,सपना शहारे,अनंत राऊत, संदीप खोडकुंभे, पूजा फुके इत्यादि वनरक्षक होते तर राधा कृष्ण मदिराचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ अलोणे,श्रीकृष्ण अतकरी,रामचंद्र राऊत,ओंकार कुमरे, दिंगाबर गावंडे,बळीराम शहारे,संतोष सुरोशे,नामदेवराव मडावी,ओमप्रकाश लोहिया,किशोर चुंगडे, यांनी आयोजन केले तर यात प्रामुख्याने निलेश शहारे,अमोल चौधरी, नागोराव देवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©