यवतमाळ सामाजिक

प्लास्टिक चा कहर,करू या मुक्त शहर

सहसंपादक गोकुल खडसे

प्लास्टिक चा कहर,करू या मुक्त शहर

इको लव्हर ग्रुप व संकल्प फाउंडेशन ने हाती घेतलेल्या प्लास्टिक मुक्त शहराच्या संकल्पनेचा आजचा तिसरा रविवार होता,प्रभू श्री रामचंद्र ह्यांच्या जन्मदिनी व रामनवमी चे औचित्य साधून सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत श्रमदानाला सुरवात करण्यात आली,स्थानिक समर्थवाडी परिसरातील नगर परिषद शाळा क्र 19 ह्या परिसराची स्वच्छता करण्यात आली,ती ह्या करीता की यवतमाळ शहरातील घाण अवस्थेत रहाणारे मनोरुग्ण ह्या ठिकाणी निवासासाठी राहणार आहे,त्यांना ह्यापुढे स्वच्छ परिसर लाभावा ह्या भावनेने संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त व स्वच्छ करण्यात आला,ह्या ठिकाणी निवासासाठी असणाऱ्या मनोरुग्णाची जबाबदारी नंदादीप फाउंडेशन चे संदीप शिंदे व त्यांचे सहकारी ह्यांनी घेतली असून दि 14 एप्रिल पासून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीदिनी ह्या प्रकल्पाला प्रारंभ करण्यात येणार आहे,आजच्या ह्या स्वच्छता मोहिमेनंतर मनोरुग्णांना लागणारे प्राथमिक आरोग्यविषयक साहित्य संकल्प फाउंडेशन च्या वतीने समाजशील व्यक्तिमत्वे श्री राजू जॉन व श्री प्रशांत बनगीनवार ह्यांच्या हस्ते संदीप शिंदे ह्यांना प्रदान करण्यात आले, मोहिमेनंतर लगेच नगर परिषदेच्या ट्रॅक्टर मार्फत अंदाजे 10 ते 12 पोते प्लास्टिक ची विल्हेवाट लावण्यात आली,ह्या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेसाठी संकल्प फाउंडेशनचे प्रलय टिप्रमवार,वसंत शेळके,रमेश राऊत,प्रकाश दीघडे, रवी ठाकूर,रवी माहुरकर,मनोज तांमगाडगे,आशिष महल्ले,विनोद दोंदल,राहुल दाभाडकर,चांगदेव ढवस,संजय ढोकणे,निलेश ठोंबरे,अरुण चंदरे,संकल्प वनिता वाहिनीच्या निकिता बाविस्कर,संगीता टिप्रमवार, कचोरी व चिवडा नाश्त्याची व्यवस्था करणाऱ्या अश्विनी खुळे, प्रयास च्या प्राची बनगीनवार,नंदादीप फाउंडेशन चे संदीप शिंदे,सुनील काळे,मनोरुग्ण एम सुरेश,परमेश्वर तर एक हात मदतीचा वन्यजीवासाठी संस्थेचे वन्यजीव संरक्षक दिनेश तिवाडे, अर्जुन पारवेकर,कुणाल सिडाम,अभिषेक सीडाम ,इको लव्हर ग्रुप चे शिवम चव्हाण,भूषण ठक,शशी मुटकूडे,शैलेश राठोड,आदी उपस्थित होते

Copyright ©