यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय नाट्य स्पर्धेचे आयोजन

दिग्रस येथे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय नाट्य स्पर्धेचे आयोजन

सहभाग नोंदविण्याचे आयोजन समितीतर्फे आवाहन

दोन वर्षाच्या मध्यंतरानंतर दिग्रसमध्ये प्रथमच राज्यस्तरीय एकपात्री अभिनय नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भव्य दिव्य रंगमंच उभारून रंगकर्मींसाठी ही संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मूकनायक न्युज चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, दिग्रस व मूकनायक न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय एकपात्री अभिनय नाट्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

दोन गटात ही स्पर्धा पार पडणार असून अ गट (वयोगट 16 वर्षे ते पुढे) यांच्यासाठी प्रथम- 11000 रू., द्वितीय-5000 रू., तृतीय – 3000 रू. तर चतुर्थ – 2000 रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तर ब गट (वयोगट 0 ते 15) यासाठी प्रथम- 7000 रू.,
द्वितीय-5000 रू., तृतीय-3000 रू., चतुर्थ – 2000 रुपयांची बक्षिसे राहणार आहेत. सोबतच प्रोत्साहनपर प्रत्येकी 1000 रुपयांची 10 बक्षिसे निश्चित केलेली आहेत. अ-गटासाठी 150 रू. तर ब-गटासाठी 100 रू. माफक नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.

दिनबाई शाळेच्या सभागृहात सदर स्पर्धा पार पडणार असून रात्री 7:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आपली कला या भव्यदिव्य रंगमंचावर सादर करून छटा उमटवावी,असे आवाहन आयोजन समितीचे धर्मराज गायकवाड, प्रा.मतीन खान,
संजय तिवडकर,
प्रा.मधुकर वाघमारे यांनी केले आहे.

Copyright ©