महाराष्ट्र सामाजिक

संपादकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना वृत्तपत्र, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलचे सर्व संपादक

संपादकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना वृत्तपत्र, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलचे सर्व संपादक

महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलच्या संपादकांना सूचित करण्यात येते की, ज्या वृत्तपत्राच्या संपादकांनी अद्यापही वार्षिक विवरण RNI कडे भरले नाही त्यांनी 31 मे 2022 च्या आत भरून घ्यावे. आतापर्यंत 99,173 वृत्तपत्रांना नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे ज्या न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलनी अद्यापही माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारकडे माहिती पाठविलेली नाही त्यांनी तात्काळ विहित नमुन्यात माहिती पाठवावी. जे यूट्यूब चॅनल व वेबसाईट किंवा न्यूज पोर्टल IT RULES, 2021 चे पालन करीत नाहीत त्यांचे यूट्यूब न्यूज चॅनल व वेबसाईट माहिती प्रसारण मंत्रालय यांच्याकडून ब्लॉक करण्यात येत आहेत. IT RULES, 2021च्या नियमांचे पालन न केलेले 22 यूट्यूब चॅनल व 1 वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्राच्या संपादकांनी RNI कडे वार्षिक विवरण भरून घ्यावे व न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलच्या संपादकांनी माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारकडे आपली माहिती पाठवावी. न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलसाठी पत्रकारिता करीत असतांना संपादकांनी काय काळजी घ्यावी?

Copyright ©